Take a fresh look at your lifestyle.

मोदी सरकार एलआयसीमध्ये एफडीआयची मर्यादा निश्चित करणार, ग्राहकांवर काय परिणाम होणार, वाचा..

नवी दिल्ली : भारतीय आयुर्विमा महामंडळ, अर्थात एलआयसी. देशातील या सर्वात मोठ्या विमा कंपनीबद्दल एक महत्वपूर्ण बातमी आहे. थेट विदेशी गुंतवणुकीच्या (एफडीआय) धोरणानुसार, विमा क्षेत्रात 74 टक्के परकीय गुंतवणुकीस परवानगी आहे; पण हे नियम LIC ला लागू होत नाहीत. एलआयसी कायद्यानुसार, सरकार वगळता कोणीही कंपनीत 5 टक्क्यांपेक्षा जास्त गुंतवणूक करु शकत नाही.

Advertisement

दरम्यान, सरकार LIC मध्ये एफडीआयची मर्यादा निश्चित करणार आहे. एलआयसीमध्ये परकीय गुंतवणुकीची मर्यादा सरकार 20 टक्क्यांपर्यंत निश्चित करू शकते. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधील परकीय गुंतवणुकीची मर्यादाही तीच आहे.

Advertisement

मोदी सरकार या वर्षाच्या अखेरीस एलआयसीचा आयपीओ (IPO) आणू शकते. हा देशातील सर्वात मोठा IPO असेल, असे मानले जात असून, तो एक लाख कोटी रुपयांपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. एलआयसीच्या आयपीओचे व्यवस्थापन करण्यासाठी केंद्र सरकारने 10 व्यापारी बँकांची निवड केलीय.

Advertisement

निवडलेल्या 10 बँकांमध्ये गोल्डमन सॅक्स, सिटीग्रुप, कोटक महिंद्रा आणि एसबीआय कॅप्स (Goldman Sachs, Citigroup, Kotak Mahindra and SBI Caps) यांचा त्यात समावेश आहे. शिवाय जेएम फायनान्शियल लिमिटेड, अॅक्सिस कॅपिटल, नोमुरा, बोफा सिक्युरिटीज, जेपी मॉर्गन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि आयसीआयसीआय सिक्युरिटीज यांचीही निवड करण्यात आलेली आहे.

Advertisement

एलआयसी त्याच्या आयपीओमध्ये ग्राहकांसाठी स्वतंत्र कोटा निश्चित करू शकते. इश्यू आकाराच्या 10 टक्के पॉलिसीधारकांसाठी राखीव ठेवता येतात. LIC चा IPO चालू आर्थिक वर्ष 2021-22 च्या अखेरीस म्हणजेच 31 मार्च 2021 पर्यंत येऊ शकतो. याव्यतिरिक्त डेलॉईट आणि एसबीआय कॅप्सला आयपीओपूर्वी व्यवहार सल्लागार म्हणून नियुक्त केले गेले आहे.

Advertisement

एलआयसीच्या लिस्टिंगनंतर 60 टक्के विमा व्यवसाय सूचीबद्ध कंपन्यांकडे जाईल. हे क्षेत्र एकूण अर्थव्यवस्थेच्या तुलनेत वेगाने वाढत आहे. आर्थिक व्यवहारांवरील कॅबिनेट समितीने (CCA) जुलैमध्ये एलआयसीच्या सूचीला तत्त्वतः मान्यता दिलीय.

Advertisement

राज्यात पावसाची रिपरिप सुरु, शेतकऱ्यांना माेठा दिलासा, पुढील तीन दिवस पावसाचे..
एअरटेल प्लॅनचे रेट वाढविण्याच्या विचारात.. ग्राहकांच्या खिशाला बसणार झळ..!

Advertisement
Advertisement

Leave a Reply