Take a fresh look at your lifestyle.

एअरटेल प्लॅनचे रेट वाढविण्याच्या विचारात.. ग्राहकांच्या खिशाला बसणार झळ..!

नवी दिल्ली : मोबाईल वापरकर्त्यांच्या खिशाला झळ पोचविणारी बातमी आहे. दूरसंचार कंपन्या एअरटेल आणि वोडाफोन-आयडिया पुढील 6 महिन्यांत आपल्या प्लॅनचे दर वाढविण्याच्या विचारात आहेत. येत्या काळात एअरटेलचे दर वाढविणार असल्याचे संकेत सुनील भारती मित्तल यांनी दिले होते. या दोन्ही कंपन्यांनी अलीकडेच पोस्टपेड प्लॅनच्या किमती वाढवल्या होत्या. मात्र, त्यानंतरही या कंपन्यांनी दर वाढविण्याची तयारी सुरु केली आहे.

Advertisement

भारती एअरटेल कंपनीचे मालक सुनील भारती मित्तल यांनी म्हटले आहे, की प्लॅनचे दर वाढविण्याची वेळ आलीय. चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीस ARPU (वापरकर्ता प्रति सरासरी कमाई)वर युनिट किंवा सरासरी परतावा 200 रुपयांवर नेण्याचे लक्ष्य असल्याचे एअरटेलने सांगितलंय.

Advertisement

एअरटेलचे ‘एआरपीयू’ अलिकडच्या काही महिन्यांत घसरल्याने कंपनीने दर वाढविण्याची तयारी सुरु केली आहे. वाढ तशीच ठेवण्यासाठी 200 रुपयांचे ‘एआरपीयू’ लक्ष्य निर्धारित करणे आवश्यक आहे. त्यासाठी मोबाईलचा बेस टॅरिफ 79 रुपयांवरून 99 रुपये करणे अपेक्षित आहे. दर वाढविण्याची हीच योग्य वेळ असल्याचे सुनील भारती मित्तल यांनी म्हटलेय.

Advertisement

एआरपीयू (ARPU) वाढविण्यासाठी टेलिकॉम कंपन्या त्यांचे बेस टॅरिफ वाढवितात. एअरटेल आणि व्होडाफोन-आयडियाने अलीकडेच पोस्टपेड प्लॅनचे दर वाढवले. त्यामागे एआरपीयू वाढविण्याचे लक्ष्य असल्याचे कंपन्यांनी सांगितले होते. एअरटेल 4 जी पोस्टपेड प्लॅनचे दर वाढवू शकते. प्रीपेड प्लॅनही वाढण्याची शक्यता आहे.

Advertisement

दरम्यान, एअरटेल व व्होडाफोन-आयडियासाठी दरवाढ करण्याची चाल कठीण असेल, कारण जिओ वापरकर्त्यांना त्याच्या प्लॅटफॉर्मवर स्वस्त दराने आकर्षित करीत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. कंपन्या दरवाढ करणार असल्या, तरी मोबाईल पॅक किती महाग असतील, हे अद्याप स्पष्ट नाही. कंपनीला ARPU वाढवून आपला महसूल वाढवायचा आहे, कारण अलिकडच्या महिन्यांत ARPU मध्ये घट झालीय.

Advertisement

एअरटेल कंपनीचे ARPU या वर्षी मार्च तिमाहीत 166 रुपयांवरून 145 रुपयांवर आले. त्यामुळे कंपनीचा महसूलही कमी झाला. एअरटेल ते वाढविण्याचा प्रयत्न करीत आहे. ऑपरेटर्सनी इंटरकनेक्ट युसेज चार्ज (IUC) रद्द केल्यामुळे ही घट दिसून आली. एका आकडेवारीनुसार, दूरसंचार उद्योगात IUC चे योगदान 7-8 टक्के होते, जे संपले आहे. त्याच्या समाप्तीमुळे, मोबाइल कंपन्यांच्या सरासरी उत्पन्नात वापरकर्त्यांमध्ये मोठी घट झाली.

Advertisement

एअरटेल दर वाढवून एआरपीयूचे लक्ष्य 200 रुपयांवरून 300 रुपये करु शकते. भारतात ARPU खूप कमी आहे. त्यामुळे कंपन्यांचे रिटर्न सिंगल डिजिटमध्ये आहेत. टेलिकॉम कंपन्यांनी नुकत्याच केलेल्या शुल्कवाढीमुळे उत्पन्नात चांगली वाढ झाल्याचे एअरटेलचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोपाल विट्टल यांनी अलीकडेच सांगितले होते.

Advertisement

बाब्बो ! तब्बल शंभर कोटींच्या दागिन्यांनी सजवले मंदिर, वाचा कोठे आहे अनोखे मंदिर
बाब्बो ! अनिल परबांपाठोपाठ शिवसेनेचा हा खासदार ED च्या जाळ्यात; वाचा कोणाच्या कार्यालयावर मारलाय छापा..

Advertisement
Advertisement

Leave a Reply