Take a fresh look at your lifestyle.

एक सप्टेंबरपासून बदलणार हे नियम, नागरिकांच्या जीवनावर काय परिणाम होणार वाचा..

दर महिन्याला आर्थिक बाबतीत काही बदल होत असतात. सप्टेंबर महिन्यातही अनेक नियम बदलणार आहेत, ज्याचा थेट परिणाम सामान्य लोकांच्या आयुष्यावर होणार आहे. 1 सप्टेंबरपासून लागू होणाऱ्या बदलांविषयी थोडक्यात जाणून घेऊ या…

Advertisement

पॅन आणि आधार लिंक
पॅन नंबर नि आधार क्रमांक लिंक करण्याची मुदत या महिन्यात संपणार आहे. भारतीय स्टेट बँकेने आपल्या ग्राहकांसाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदत दिली आहे. पॅन नंबर आधार क्रमांकाशी लिंक न केल्यास बँकांकडून मिळणाऱ्या सर्व सुविधा बंद होणार आहेत.

Advertisement

गॅसची किंमत
दर महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजी स्वयंपाकाच्या गॅसच्या किंमती जाहीर होत असतात. मागील काही काळातील ट्रेंड पाहता, एलपीजीच्या किमतीत घट होण्याची शक्यता कमीच आहे. उलट सप्टेंबरमध्ये त्यात वाढ होण्याची शक्यता जास्त आहे. जुलैपासून प्रत्येक महिन्यात गॅसच्या किमतीत वाढ झाली आहे. त्यामुळे सप्टेंबरमध्येही त्यात वाढ होऊ शकते.

Advertisement

घरगुती स्वयंपाकाच्या गॅस एलपीजीच्या किमतीत 18 ऑगस्टला 25 रुपये वाढ झाली होती. अनुदानित एलपीजी सिलिंडरची किंमत आता दिल्लीत प्रति 14.2 किलो सिलिंडरसाठी 859 रुपये आहे.

Advertisement

आधार-पीएफ लिंकिंग
आधार आणि पॅन लिंक प्रमाणेच पीएफ खातेही आधारशी जोडणे आवश्यक आहे. हे कामही सप्टेंबरमध्येच करावे लागणार आहे. पीएफचे यूएन आणि आधार कार्ड क्रमांक जोडलेले नसल्यास कंपनी तुमच्या पीएफ खात्यात पैसे जमा करू शकणार नाही.

Advertisement

जीएसटीआर -1 फायलिंग
जीएसटीआर -1 भरण्यासाठी केंद्रीय जीएसटी नियमांतर्गत नियम 59 (6) सप्टेंबरच्या सुरुवातीपासून लागू होईल. या नियमानुसार जीएसटीमध्ये नोंदणी केलेली कोणतीही व्यक्ती ज्याने फॉर्म जीएसटीआर-3 बी भरला नाही, तर तो फॉर्म जीएसटीआर -1 भरू शकणार नाही.

Advertisement

चेक क्लिअरन्स तपासा
रिझर्व्ह बँकेने गेल्या वर्षी चेक क्लिअरन्स सिस्टीमबाबत नवीन नियम केला होता. त्याला ‘सकारात्मक वेतन प्रणाली’ असे नाव दिले होते. धनादेश देणारी व्यक्ती वा संस्थेची पडताळणी करण्यास बँकांना सांगितले होते. ग्राहकांची फसवणूक रोखण्यासाठी हे पाऊल उचलले आहे.

Advertisement

एखाद्याने 50,000 वा त्याहून अधिक किंवा 5 लाख किंवा त्याहून अधिक रुपयांचा धनादेश दिल्यास प्रथम माहिती बँकेला द्यावी लागेल. माहिती न दिल्यास चेक बाऊन्स होऊ शकतो.

Advertisement

एअरटेलमध्ये गुगल करणार गुंतवणूक, ग्राहकांवर काय परिणाम होणार, वाचा..!
टोमॅटो उत्पादकांना दिलासा..! मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय.. शेतकऱ्यांचा कसा फायदा होणार पाहा..

Advertisement
Advertisement

Leave a Reply