Take a fresh look at your lifestyle.

पीएफ काढताना या गोष्टींची घ्या काळजी, असा करा ऑनलाईन अर्ज..!

नवी दिल्ली : भविष्यनिर्वाह निधी अर्थात पीएफ.. नोकरदार व्यक्तीच्या उतार वयाची असणारी जमापूंजी. प्रत्येक कंपनी वा संस्था आपल्या कर्मचाऱ्याच्या पगारातून ठराविक रक्कम दर महिन्याला पीएफ खात्यात जमा करीत असते. आयुष्याच्या उत्तरार्धात कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी ही तजवीज केलेली असली, तरी अनेकदा काही कारणांनी आर्थिक अडचण येते.

Advertisement

अशा वेळी नोकरदार व्यक्तीला या पीएफमधील काही रक्कम आगाऊ काढता येते. तशी सोय करण्यात आली आहे. मात्र, घाईघाईत पीएफमधील चे पैसे काढताना बऱ्याचदा काही चुका होतात नि त्या निस्तरता निस्तरता नाकीनऊ येते. नेमक्या काय चुका होऊ शकतात, याबाबत जाणून घेऊ या..

Advertisement
 • भविष्यनिर्वाह निधी खात्याचा UAN नंबर आणि बँकखाते लिंक केले आहे का, हे तपासा. UAN नंबर नि बँकखाते लिंक नसल्यास पैसे काढण्यात अडचणी येतात. शिवाय EPFO च्या रेकॉर्डसमध्ये बँकेचा योग्य IFSC Code नमूद केलेला असावा.
 • पीएफ खातेधारकाने अनेकदा केवायसीची पूर्तता केलेली नसते. त्यामुळे तुमचा अर्ज बाद होऊ शकतो.  तुमचा केवायसी तपशील योग्य असणे गरजेचे आहे. तुम्ही EPFO च्या संकेतस्थळावर जाऊन या गोष्टी तपासू शकता.
 • तुमच्या कागदपत्रांवरील जन्मतारीख आणि ईपीएफओच्या रेकॉर्डसमधील जन्मतारीख वेगवेगळी असेल, तरी तुमचा अर्ज बाद केला जाऊ शकतो.
 • EPFO ने UAN नंबर आधार कार्डाशी लिंक करणे सक्तीचे केले आहे. तसे न केल्यास तुम्हाला पीएफ खात्यातून पैसे काढता येणार नाहीत. यासाठीची सगळी नियमावली EPFOकडून जाहीर करण्यात आली आहे.
 • तुम्ही फॉर्म भरताना चुकीचा बँक अकाऊंट नंबर टाकल्यास पैसे काढताना अडचण येऊ शकते. त्यामुळे फॉर्म काळजीपूर्वक भरा, अन्यथा फॉर्म रद्द होऊ शकतो.

अर्ज कसा भरणार..?

Advertisement
 1. सर्वप्रथम www.epfindia.gov.in संकेतस्थळावर जा.
 2. संकेतस्थळावर  क्लेम (फॉर्म -31,19,10 सी आणि 10 डी) भरावा.
 3. बँकखात्याचे शेवटचे चार अंक टाकून व्हेरिफिकेशन प्रक्रिया पूर्ण करा.
 4. ‘प्रोसिड फॉर ऑनलाईन क्लेम’ या पर्यायवर क्लिक करावे. तुमच्यासमोर एक ‘ड्रॉपडाऊन मेन्यू’ येईल. त्यात Advacne (Form 31) हा पर्याय निवडावा.
 5. Form 31 भरताना पैसे काढण्याचे कारण नमूद करावे लागेल. नंतर किती रक्कम हवी, हे नमूद करा. बँकेच्या चेकची स्कॅन कॉपी आणि पत्ता फॉर्ममध्ये नमूद करावा.
 6. तुम्हाला मोबाईलवर ओटीपी येईल. हा ओटीपी टाकल्यानंतर तुमचा क्लेम फाईल होईल.

एअरटेलमध्ये गुगल करणार गुंतवणूक, ग्राहकांवर काय परिणाम होणार, वाचा..!
एक सप्टेंबरपासून बदलणार हे नियम, नागरिकांच्या जीवनावर काय परिणाम होणार वाचा..

Advertisement
Advertisement

Leave a Reply