Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो ! अनिल परबांपाठोपाठ शिवसेनेचा हा खासदार ED च्या जाळ्यात… वाचा कोणाच्या कार्यालयावर मारलाय छापा..

अनिल परब यांच्यापाठोपाठ शिवसेेनेच्या खासदार भावना गवळी यांच्या कार्यालयांवर ईडीने छापे मारल्याने राज्याचे राजकारण चांगलेच तापण्याची शक्यता आहे.

मुंबई : देशात ईडी प्रकरण चांगलेच गाजत आहे. एकापाठोपाठ विरोधी पक्षाच्या अनेक नेत्यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. त्यातच विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर शरद पवारांना आलेली ईडीची नोटीस चांगलीच गाजली होती. त्यानंतर विरोधी पक्षाच्या अनेक नेत्यांवर ईडीने कारवाईचा बडगा उगारला. अनिल देशमुख, एकनाथ खडसे यांची संपत्ती जप्त करत ईडीने कारवाई केली. तर शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांना कोंडीत पकडले.

Advertisement

आता ED ने शिवसेनेचे परिवहनमंत्री अनिल परब यांना नोटीस दिली आहे. त्याने राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. शिवसेनेसह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अनिल परब यांना आलेल्या ईडीच्या नोटीसीवर तिखट प्रतिक्रीया व्यक्त केल्या आहेत. तर भाजप ईडीचा राजकारणासाठी वापर करत असल्याचा आरोप केला जात आहे.

Advertisement

भाजपाने शंभर कोटींच्या घोटाळ्याचा शिवसेनेच्या यवतमाळच्या खासदार भावना गवळी यांच्यावर आरोप केला होता. तसेच अंमलबजावणी संचालनालयाकडे तक्रारही केली होती.  त्यावरून ईडीने भावना गवळी यांच्या वाशिम आणि यवतमाळ येथील पाच कार्यालयांवर छापे टाकले आहेत. या छाप्याबाबत ईडीच्या अनेक टीम वाशिममध्ये दाखल झाल्या आहेत.

Advertisement

वाशिम जिल्ह्यात रिसोडजवळून हा छापा सुरू झाल्याची माहिती समोर येत आहे. उत्कर्ष प्रतिष्ठान, बालाजी सहकारी पार्टिकल बोर्ड, बीएमएस कॉलेज, रिसोडमधील भावना अॅग्रो प्रॉडक्ट सर्व्हिस लिमिटेड, या कंपन्यांवर ईडीने छापेमारी केली आहे.

Advertisement

भावना गवळी यांचा श्री बालाजी पार्टिकल बोर्ड नावाचा कारखाना आहे. या कारखान्यासाठी राष्ट्रीय सहकार महामंडळाने 29 कोटी, तर राज्य सरकारने 14 कोटींचे अनुदान दिले होते. मात्र, 43 कोटींचे अनुदान घेऊनही भावना गवळी यांनी हा कारखाना सुरू केला नाही. याउलट त्यांनी 7 कोटी रुपयांची किंमत दाखवून हा कारखाना दुसऱ्या संस्थेला विकला. याच घोटाळा प्रकरणात भावना गवळी यांनी सीए (CA)  उपेंद्र मुळे यांच्यावर चुकीचा अहवाल देण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप केला आहे.

Advertisement

भावना गवळी यांच्या पाच ठिकाणी असलेल्या कार्यालयांवर ईडीने छापेमारी केली आहे. यावर शिवसेनेच्या खासदार भावना गवळी (MP Bhavana Gawali) यांनी अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) या कारवाईला चुकीचे म्हटले आहे. त्या म्हणाल्या की, ईडीने भाजपच्या आदेशावरून कोणतीही सूचना न देता ही कारवाई केली आहे.

Advertisement

अनिल परब यांना ईडीने नोटीस पाठवत 31 ऑगस्ट रोजी ईडीच्या कार्यालयात हजर राहण्यास सांगितले आहे. तसेच अनिल परब यांची अनिल देशमुख प्रकरणात चौकशी केली जाणार आहे. त्यामुळे ईडीच्या नोटीसीनंतर परब संजय राऊत यांची भेट घेणार आहेत. मात्र आता अनिल परब यांच्यापाठोपाठ शिवसेेनेच्या खासदार भावना गवळी यांच्या कार्यालयांवर ईडीने छापे मारल्याने राज्याचे राजकारण चांगलेच तापण्याची शक्यता आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply