Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो ! तब्बल शंभर कोटींच्या दागिन्यांनी सजवले मंदिर, वाचा कोठे आहे अनोखे मंदिर…

ग्वाल्हेर येथील गोपाळ मंदिरात जन्माष्टमीच्या निमित्ताने राधा कृष्णाची मुर्तीला 100 कोटी रुपयांच्या दागिण्यांनी  सजवले जाते.

ग्वाल्हेर : देशात कृष्णजन्माष्टमी आणि गोपालकाला मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. महाराष्ट्रातही दहीहंडी उत्सव साजरा केला जातो. त्यासाठी गोविंदा पथके तयार केली जातात. मोठ-मोठी बक्षिसे दिली जातात. असाच कृष्णाजन्माष्टमीचा उत्साह मध्यप्रदेशातील(MP) ग्वालियर (Gwaliar) येथे असतो.

Advertisement

ग्वाल्हेरच्या ऐतिहासिक गोपाळ मंदिरात राधा कृष्ण मौल्यवान दागिन्यांनी सजले जातात.  हिरे, सोने आणि मौल्यवान धातूंनी बनवलेल्या या दागिन्यांची किंमत आजच्या तारखेला एक अब्ज रुपयांपेक्षा जास्त आहे. कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी बँकेकडून ग्वाल्हेरच्या गोपाळ मंदिरात कडेकोट बंदोबस्तात दागिने आणले जातात. तसेच मंदिराच्या आवारात दागिने असतील तोपर्यंत ग्वाल्हेरचे 100 पोलीस कर्मचारी सुरक्षेसाठी मंदिर परिसरात तैनात असतात.

Advertisement

ग्वाल्हेर येथील गोपाळ मंदिरात जन्माष्टमीच्या निमित्ताने राधा कृष्णाची मुर्तीला 100 कोटी रुपयांच्या दागिण्यांनी  सजवले जाते. ग्वाल्हेरचे गोपाळ मंदिर सिंधिया कुटुंबाने बांधले आहे. तसेच देवासाठी त्यांचे दागिनेही ग्वाल्हेरच्या राजघराण्याने बनवले होते. आता हे दागिने सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या लॉकरमध्ये ठेवले जातात. तर कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी हे दागिने राधा कृष्णाला परीधान केले जातात.

Advertisement

यंदाही गोपाळ मंदिर दागिण्यांनी सजवण्यात आले आहे. रात्री बारा वाजल्यापासून भाविक भगवंताचे दिव्य रूप पाहण्यासाठी येथे पोहोचण्यास सुरुवात करतात. सुरक्षिततेच्या दृष्टीने भाविकांना गर्भगृहात जाण्याची परवानगी दिली जात नाही. मात्र राधा कृष्णाचे दिव्य रूप पाहण्यासाठी भाविक वर्षभर थांबतात. अनमोल दागिन्यांची चमक पाहून लोकांच्या नजरा हटत नाहीत.

Advertisement

ग्वाल्हेरच्या राजघराण्याने फुलबाग परीसरात मंदिराची उभारणी केली होती. तर 1921 मध्ये मंदिराचे जीर्णोधार केला होता.  तर भगवंतासाठी अनमोल किंमतीची ज्वेलरी बनवण्यात आली होती.  तर स्वातंत्र्यानंतर सिंधीया परीवाराने दागिने भारत सरकारकडे सुपुर्द केले. त्यानंतर नगर निगमतर्फे दागिने बँकेत ठेवले जातात. तर 2007 पासून दागिण्यांनी भगवंताची मुर्ती सजवली जाते.

Advertisement

कृष्णजन्माष्टमीच्या पार्श्वभुमीवर अनेक अधिकारी आणि पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात मंदिर सजवले जाते.

Advertisement
Advertisement

Leave a Reply