Take a fresh look at your lifestyle.

नितीश कुमार यांच्या पंतप्रधान पदाबाबत भाजप म्हणाले असं काही…

नितीश कुमार यांच्या जदयूने राष्ट्रीय परीषदेत पंतप्रधान पदाबाबत ठराव मंजूर केल्यानंतर त्यावर भाजपाकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे.

दिल्ली : देशाच्या पंतप्रधान पदाबाबत अनेक नेते गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. तर पंतप्रधान पदाबाबत अनेक नेत्यांची महत्वाकांक्षा काही लपून राहिलेली नाही. राज्यातही शरद पवार, नितीन गडकरी, उध्दव ठाकरे यांच्या पंतप्रधान पदाबाबत कायम चर्चा होत असतात. त्यातच आता बिहारचे मुख्यमंत्री असलेले आणि सध्या भाजपाच्या कृपेने बिहारच्या मुख्यमंत्री पदी विराजमान असलेले नितीश कुमार यांच्या पंतप्रधान पदाबाबतच्या चर्चेला उधान आले आहे.

Advertisement

२०१४ साली नितीश कुमार यांनी नरेंद्र मोदींच्या पंतप्रधान पदाला विरोध करत एनडीएची साथ सोडली होती. त्यानंतर अनेक वेळा त्यांची पंतप्रधान पदाची महत्वाकांक्षा लपून राहिली नाही. २०१९ च्या लोकसभा निवडणूकीसाठी विरोधकांनी एकजूट केली असताना नितीश कुमार हे पंतप्रधान पदासाठी इच्छूक होते. त्यावेळी नितीश कुमार यांच्यासह प्रमुख विरोधी पक्षांनी महागठबंधन स्थापन केले होते. मात्र त्यात नितीश कुमार यांच्या नावावर एकमत झाले नाही. त्यामुळे त्यांनी परत बिहारचे मुख्यमंत्रीपद पदरात पाडून घेत भाजपाशी संसार थाटला.

Advertisement

आता पुन्हा नितीश कुमार यांच्या पंतप्रधानपदाविषयीच्या चर्चेला उधान आले आहे. बिहारमध्ये  नितीशकुमार यांची पीएम मटेरियल म्हणून चर्चा सुरू झाली आहे. जेडीयूच्या राष्ट्रीय परिषदेत झालेल्या बैठकीत पंतप्रधान पदासाठी  नितीश कुमार यांच्याकडे सर्व पात्रता असण्याबाबत एक ठराव मंजूर करण्यात आला.  त्यामुळे राष्ट्रीय राजकारणात नवी चर्चा सुरू झाली.

Advertisement

नितीश कुमार यांच्या जदयूने राष्ट्रीय परीषदेत पंतप्रधान पदाबाबत ठराव मंजूर केल्यानंतर त्यावर भाजपाकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे. बिहार भाजपचे प्रवक्ते डॉ.निखिल आनंद म्हणाले की, ही जदयू (JDU) ची बैठक होती आणि तेथे राजकीय ठराव पास करणे ही कोणत्याही पक्षाची अंतर्गत बाब आहे.

Advertisement

भाजप ओबीसी मोर्चाचे राष्ट्रीय सरचिटणीस निखिल आनंद म्हणाले की, सर्व राजकीय पक्ष आपल्या नेत्यांविषयीच्या महत्त्वाकांक्षा व्यक्त करत असतात. कोणत्याही राजकीय पक्षासाठी ही बाब नवीन नाही. नितीश कुमार एनडीए आणि बिहारमधील आमच्या सरकारचे नेतृत्व करत आहेत. बिहार एक आघाडीचे राज्य बनवण्यासाठी आम्ही सर्वजण त्याच्या नेतृत्वात पुढे जात आहोत. भाजपला आपल्या आघाडीतील भागीदार आणि त्यांच्या नेत्यांबद्दल आदर आहे. भाजप इतर पक्षांमध्ये डोकावत नाही. तर हे राजद आणि इतर काही पक्षांचे काम आहे, असे मत व्यक्त केले.

Advertisement
Advertisement

Leave a Reply