Take a fresh look at your lifestyle.

एअरटेलमध्ये ‘गुगल’ करणार गुंतवणूक, ग्राहकांवर काय परिणाम होणार, वाचा..!

मुंबई : गुगलने जिओ प्लॅटफॉर्ममध्ये 34,000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. त्यानंतर गुगलने आता एअरटेलमध्ये (Airtel) गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. भारती एअरटेलमध्ये गुगल (Google) लवकरच मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षभरापासून या दोन्ही कंपन्यांमध्ये चर्चा, वाटाघाटी सुरु आहेत. या चर्चा आता महत्त्वाच्या टप्प्यात आल्या असून, लवकरच याबाबत घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.

Advertisement

देशभरात 4G नेटवर्क क्षमता वाढविण्यासाठी भारती एअरटेल आधीपासूनच पैसे गोळा करण्याच्या विचारात आहे. अशा वेळी गुगल आणि एअरटेल यांच्यात करार झाल्यास भारती एअरटेलच्या सुनील मित्तल यांच्या नेतृत्वाखालील या दूरसंचार कंपनीसाठी हा मोठा दिलासा असेल.

Advertisement

आपल्या या कराराबाबत गुगल आणि एअरटेलने कोणतीही औपचारिक घोषणा केलेली नाही. मात्र, गुगलच्या आगमनामुळे एअरटेलची बॅलेन्सशीट मजबूत झाली आहे. तसेच, ही कंपनी भागीदार कंपनीला स्ट्रॅटजिकली मदत करते. कारण गुगल डेटा विश्लेषणाबाबत जगातील कोणत्याही मोठ्या कंपनीपेक्षा चांगली आहे. एअरटेलला त्यांच्या रियलायजेशन आणि प्रॉफिटेबिलिटीमध्ये सुधारणा करण्यासाठी त्यांचा डेटा अधिक चांगल्या पद्धतीने मॉनिटाईज करण्यासाठी गुगल मदत करील.

Advertisement

बिल्ट-इन मोबिलिटी काय आहे, हे पाहणे बाकी आहे, कारण जिओ आणि गुगलच्या भागीदारीनंतर एअरटेल किंवा व्होडाफोन आयडियासह त्यांच्या कोणत्याही स्पर्धकांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी निर्बंध घालू शकतात.

Advertisement

व्होडाफोन आयडियाच्या (Vi) सर्व ग्राहकांना कायम ठेवण्यासाठी त्यांना मोठ्या क्षमतेच्या नेटवर्कची आवश्यकता असेल. अशा प्रकारे कंपनीमध्ये गुगलची मोठी गुंतवणूक भारती एअरटेलसाठी बरेच काही ठरवू शकते. यामुळे टेलिकॉम कंपनीला सरकारचे कर्ज सहज फेडता येईल, सोबतच 4G आणि 5G नेटवर्कमध्ये गुंतवणूक करता येणार आहे.

Advertisement

टोमॅटो उत्पादकांना दिलासा..! मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय.. शेतकऱ्यांचा कसा फायदा होणार पाहा..
आणि पॅरॉलिंपिकमध्ये भारताची पदकांची लयलूट सुरूच, वाचा भारताला किती मिळाले पदक..

Advertisement
Advertisement

Leave a Reply