Take a fresh look at your lifestyle.

काबुल विमानतळ बाँबस्फोटाने हादरवणाऱ्या ISIS-K चा खतरनाक आतंकी चेहरा, पहा युवकांना असे ओढतात जाळ्यात…

अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्य माघारीच्या सुरूवातीपासून पाकिस्तान, मध्य आशिया, रशियाचा उत्तर काकेशस आणि चीनच्या झिंजियांगमधून 8,000-10,000 परदेशी तरूण संघटनेत सहभागी झाले आहेत.

दिल्ली : जगात अनेक दहशतवादी संघटना कार्यरत आहेत. अनेक युवक दहशतवादी या संघटनांमध्ये सहभागी होत आहेत. त्यातच अफगाणीस्तानमध्ये कार्यरत असलेल्या मुजोर तालीबान्यांनी अमेरीकी सैन्य माघारीच्या आतच अफगाणीस्तानात हैदोस घालत अनेक नागरीकांना वेठीस धरले. अफगाणीस्तानमधील नागरीक जीव मुठीक धरून विमानतळावर जमले असताना काबुल विमानतळ बॉम्बस्फोटाने हादरले. मात्र या मागचा क्रुर चेहरा तालिबान्यांचा नव्हता तर, तालिबान्यांसारख्याच असलेल्या आयसीस खुरासान (ISIS-K) या अत्यंत क्रुर मानल्या जाणाऱ्या दहशतवादी संघटनेचा होता.

Advertisement

गुरूवारी अफगाणीस्तानची राजधानी काबुल विमानतळ बाँबस्फोटाने हादरल्याची एक हृदयद्रावक घटना पुन्हा समोर आली. या आत्मघाती बॉम्बस्फोटात 169 अफगाण  आणि 13 अमेरिकन सैनिक ठार झाले.  तर इस्लामिक स्टेट-खुरासन (ISIS-K) ने या हल्ल्याची जबाबदारी घेतली.  दहशतवाद्यांनी अफगाणीस्तानातून  बाहेर पडणारे अमेरिकन सैनिक, अफगाण नागरिक आणि तालिबानी सैनिक यांना लक्ष्य करीत हल्ला केला.

Advertisement

ISIS- K तालिबान्यांचे कट्टर शत्रु आहेत तसेच ते तालिबानला अमेरीकेच्या हातचे बाहुले मानतात. तालिबानने खऱ्या अर्थाने शरियाला प्रोत्साहन न दिल्याचा त्यांचा आरोप आहे. इसिसच्या या उपसंघटनेने अफगाणिस्तानात जिहादच्या नव्या टप्प्याचे आश्वासनही दिले आहे.

Advertisement

जिहादच्या नावाखाली दहशतवादाचा चेहरा किती भयावह असू शकतो हे इस्लामिक स्टेट-खोरासन (इसिस-के) ने सध्या दाखवले आहे. तसेच इसिस-केच्या धक्कादायक हल्ल्यानंतर अफगाणीस्तानमध्ये क्रुरतेच्या जीवावर सत्ता मिळवणाऱ्या तालीबान्यांसमोर आव्हाने कमी नाहीत, असे स्पष्ट होत आहे.

Advertisement

इसिस- के तालिबानपेक्षा जास्त क्रुर आहे. तालिबान स्वतःला अफगाणी राष्ट्रवादी म्हणून सादर करतात. तसेच स्वतःला पश्तून समाजाचे प्रतिनिधी मानतात. मात्र ISIS-K ची विचारधारा ISIS (इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरिया)या दहशतवादी संघटनेशी प्रेरीत आहे. ISIS ने 2014 मध्ये इराकी फौजांना हाकलून दिल्यानंतर मोलुसला आपली राजधानी घोषित करत अबु बकर अल बगदादीने स्वतःला मुस्लिमांचा नवा खलिफा जाहीर केले होते.

Advertisement

त्यानंतर इसिसची ताकद वाढत गेली. त्यानंतर ISIS-K चे प्रमुख आणि केडर पाकिस्तान आणि उजबेकिस्तानातील लोकांचे बनले आहे.  तर इसिस के संघटना तालिबानपेक्षा खतरनाक मानली जाते. त्यांना इराण, मध्य आशियाई देश, अफगणिस्तान, पाकिस्तान या देशांचा मिळून मुस्लिम प्रदेश बनवायचा आहे. तर या देशांमध्ये राहणाऱ्या शिया, हिंदू, ख्रिच्चन आणि शीख यांची सफाई  करण्याचे त्यांनी उद्दिष्ट ठेवले आहे.

Advertisement

दहशतवाद्यांविरोधात इतके ऑपरेशन होऊनही  पाकिस्तान, मध्य आशिया, रशियाचे उत्तर काकेशस आणि चीनचे झिंजियांगचे धार्मिक कट्टरपंथी दहशतवाद्याचे कारखाने बनले आहेत. तर अफगणिस्तानमधील ताज्या परिस्थितीचा इसिस के फायदा उठवत आली पकड मजबुत करत आहे.

Advertisement

संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार, अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्य माघारीच्या सुरूवातीपासून पाकिस्तान, मध्य आशिया, रशियाचा उत्तर काकेशस आणि चीनच्या झिंजियांगमधून 8,000-10,000 परदेशी तरूण संघटनेत सहभागी झाले आहेत. तर त्यांना अफगणिस्तानमध्ये पुर्ण इस्लामिक शासन हवे आहे.

Advertisement

ही संघटना सुनियोजितरित्या शिकार शोधत असतात. त्यांची एक तुकडी इंटरनेटवर कार्यरत राहुन इस्लामिक विचारांशी संबंधीतांवर नजर ठेवते. त्यानंतर अशा इंटरनेटवरील युवकांचे ब्रेनवॉश करून त्यांना आपल्या जाळ्यात ओढले जाते. एकदा तरूण या जाळ्यात फसले तर त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग अशक्य होऊन जातो.  त्यामुळे युवकांनी अशा घातक प्रवृत्तींपासून सावध राहायला हवं.

Advertisement
Advertisement

Leave a Reply