Take a fresh look at your lifestyle.

..आणि तालिबानने भारताच्या अफगाणिस्तानधील गुंतवणूकीवर केले वक्तव्य, पहा काय म्हणाला तालिबानी नेता..

आम्ही भारतासोबतच्या आपल्या राजकीय, आर्थिक आणि व्यापारी संबंधांना योग्य महत्त्व देतो आणि हे संबंध असेच रहावेत अशी आमची इच्छा आहे.

दिल्ली : १५ ऑगस्टच्या दरम्यान तालिबानने अशरफ घनी सरकारच्या हातून अफगाणिस्तानची सुत्रे हिसकावून घेतले. त्यानंतर तालिबान्यांच्या क्रुरतेचे किस्से जगभर पसरले. तर अफगाणिस्तानातील नागरीक जीव मुठीत धरून देशाबाहेर पडताना दिसले. त्यामुळे संपुर्ण जगाचं लक्ष अफगाणिस्तानकडे लागले होते. भारताची अफगाणिस्तानमध्ये मोठी गुंतवणूक केली होती. त्यामुळे अफगाणिस्तानात तालिबान्यांची सत्ता आल्याने भारताची चिंता वाढली होती.

Advertisement

क्रुर तालिबानने नागरीकांना वेठीस धरत असल्याच्या वृत्ताचा वेळोवेळी इन्कार केला. तर विविध देशांना अफगाणिस्तानात दुतावास सुरू करण्यासाठी आमंत्रित केले. तालिबानचे प्रवक्ते सुहेल शाहीन आणि जबीउल्लाह मुजाहिद यांनीही भारताशी असलेल्या संबंधांबद्दल त्यांच्या गटाचे विचार अनेक वेळा वेगवेगळ्या माध्यमांवरून व्यक्त केले. मात्र आता तालिबानचे महत्वाचे नेते असलेल्या स्टेनकजई यांनी दुसऱ्या देशांच्या संबंधावर भाष्य केले.

Advertisement

स्टेनकजई यांनी पश्तून भाषेतून अफगाणिस्तानातील युध्द संपल्याचे आणि शरियतवर आधारीत इस्लामिक प्रशासन निर्माण करण्याबद्दल विस्तृत माहिती दिली. तालिबानने आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून शेर मोहम्मद अब्बास स्टॅनकजई यांचा ४६ मिनिटांचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यामध्ये भारत, पाकिस्तान, चीन आणि रशियासह प्रमुख देशांशी असलेल्या संबंधाबाबत तालिबानची भुमिका स्पष्ट केली.

Advertisement

१५ ऑगस्ट रोजी तालिबानने अफगाणिस्तानच्या सत्तेची सुत्रे हाती घेतल्यानंतर प्रथमच तालिबानच्या बड्या नेत्याने भारतासोबतच्या संबंधाबाबत मत मांडले आहे. यावेळी शेर मोहम्मद अब्बास स्टेनकजई म्हणाले की, भारत या उपखंडासाठी खूप महत्त्वाचा आहे. भारतासोबत अफगाणिस्तानचे सांस्कृतिक, आर्थिक आणि व्यापारी संबंध पूर्वीप्रमाणेच चालू ठेवण्याची आमची इच्छा आहे. तसेच या क्षेत्रातील व्यापारासाठी तालिबानच्या योजनांबद्दल म्हणाले की, पाकिस्तानच्या माध्यमातून भारतासोबत व्यापार करणे आमच्यासाठी गरजेचे आहे. तसेच भारताबरोबर हवाई कॉरिडॉरद्वारे खुल्या व्यापारास परवानगी असेल. मात्र भारताबरोबर व्यापार दुतर्फा असावा की नाही, हे त्यांनी स्पष्ट केलेले नाही. पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या व्यापाऱ्यांना त्यांच्या मालकीच्या वस्तू भारतात पाठवण्याची परवानगी दिली आहे. मात्र भारतीय माल पाकिस्तानी भूमीतून अफगाणिस्तानात नेण्याची परवानगी दिली नाही. त्यामुळेे स्टेनकजई म्हणाले की, आम्ही भारतासोबतच्या आपल्या राजकीय, आर्थिक आणि व्यापारी संबंधांना योग्य महत्त्व देतो आणि हे संबंध असेच रहावेत अशी आमची इच्छा आहे. आम्ही या संदर्भात भारतासोबत संबंध सुदृढ बनवण्यासाठी आशादायी आहोत.

Advertisement

भारताने गुंतवणूक केलेल्या आणि भारतासाठी अत्यंत महत्वाच्या असलेल्या तुर्कमेनिस्तान-अफगाणिस्तान-पाकिस्तान-भारत (TAPI) गॅस पाइपलाइन प्रकल्पाचा उल्लेख करत स्टेनकजई म्हणाले की, सरकार स्थापन झाल्यावर तालिबान प्रकल्पासाठी येणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी काम करेल. तर इराणशी असलेल्या संबंधांबद्दल बोलताना स्टेनकजई यांनी भारताने विकसित केलेल्या चाबहार बंदराचाही उल्लेख करत व्यापाराचे महत्व आधोरिखित केले. तसेच भारतासोबत सांस्कृतिक, आर्थिक आणि व्यापारी संबंध पूर्वीप्रमाणेच चालू ठेवण्याची इच्छा व्यक्त केली.

Advertisement
Advertisement

Leave a Reply