Take a fresh look at your lifestyle.

…आणि पॅरॉलिंपिकमध्ये भारताची पदकांची लयलूट सुरूच, वाचा भारताला किती मिळाले पदक..

भारताने एकूण तीन पदक जिंकत इतिहास रचला आहे. या तीनही खेळाडूंचे पंतप्रधानांनी अभिनंदन केले आहे.

दिल्ली : भारतीय खेळाडूंनी टोक्यो ऑलिंपिकमध्ये (Olympic) एक सुवर्ण, दोन रौप्य आणि चार कांस्य पदकांसह 7 पदकांची कमाई करत इतिहास रचला. त्यानंतर टोक्यो पॅरॉलिंपिकमध्ये (Paralympics) भारताच्या खेळाडूंनी सहभाग घेत आपली विजयी घोडदौड कायम ठेवली. खेळावर लक्ष केंद्रीत राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या (National Sport Day) पार्श्वभुमीवर भारतीय खेळाडूंनी पदकांची लयलूट सुरू केली.

Advertisement

भारतीय अॅथलिट असलेल्या निषाद कुमार याने उंच उडी T-47 या क्रीडाप्रकारात रौप्य पदक जिंकत इतिहास रचला. 32 वर्षीय निषाद कुमार याने 2.06 मीटर ऊंच उडी मारत रौप्य पदकावर नाव कोरले. निषाद कुमारच्या बाबतीत उल्लेखनिय बाब म्हणजे त्याने 2019 मध्ये दुबई येथे पार पडलेल्या वर्ल्ड पॅरा अॅथलेटिक्स ग्रँड फ्री मध्ये ऊंच उडीमध्ये सुवर्णपदक जिंकत टोक्यो पॅरॉलिंपिकसाठी स्थान निश्चित केले होते. निषादने पदक जिंकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी निषादचे अभिनंदन करताना म्हणाले की, आणखी एक चांगली बातमी टोक्योहून आली. निषाद कुमारला पुरुषांच्या उंच उडी टी -47 मध्ये रौप्य पदक जिंकताना पाहून खूप आनंद झाला. उत्कृष्ट कौशल्य आणि चिकाटी असलेला तो एक उल्लेखनीय खेळाडू आहे त्याचे अभिनंदन…

Advertisement

Advertisement

भारताची भाविनाबेन पटेल यांनी पॅरॉलिम्पिक टेबल टेनिस स्पर्धेत रौप्य पदकावर नाव कोरले. त्यांंनी महिला एकल फायनल मध्ये चीनच्या झाऊ यिंग यांच्याकडून पराभव पत्करत रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.

Advertisement

विनोद कुमार यांनी थाळीफेक या क्रीडाप्रकारात कांस्यपदक जिंकत देशाला तिसरे पदक मिळवून दिले. विनोद कुमारने थाळी फेकच्या F52 प्रकारात 19.98 मीटर थ्रोसह आशियाई विक्रम नोंदवला. विनोदने सहा प्रयत्नांमध्ये (Attempt) 17.46 मीटर थाळी फेकून सुरुवात केली.  तर यानंतर, त्याने 18.32 मीटर, 17.80 मीटर, 19.20 मीटर, 19.91 मीटर आणि 19.81 मीटर थाळी फेकली. त्याचा पाचवा थ्रो 19.91 मीटर असल्याने सर्वोत्तम थ्रो मानला गेला. यासह त्याने आशियाई विक्रम आपल्या नावावर केला.

Advertisement

विनोद कुमारचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्वीट करून अभिनंदन केले. त्यावेळी मोदी म्हणाले की, विनोद कुमारच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे देश आनंदी आहे. कांस्यपदकासाठी  विनोद कुमारचे अभिनंदन. त्यांची मेहनत आणि निर्धार उत्कृष्ट यश मिळवून देत आहे.

Advertisement

भारताने एकूण तीन पदक जिंकत इतिहास रचला आहे. या तीनही खेळाडूंचे पंतप्रधानांनी अभिनंदन केले आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply