Take a fresh look at your lifestyle.

अनिल परब यांना ईडीची नोटीस, संजय राऊत यांनी काय म्हटलेय पाहा..?

मुंबई : शिवसेनेचे महत्वाचे नेते व राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) नोटीस बजावण्यात आली आहे.  शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्विट करुन ही माहिती दिली. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या 100 कोटी रुपये वसुली प्रकरणात परब यांना हे समन्स जारी करण्यात आले आहे.

Advertisement

शिवसेना व भाजप यांच्यातील राजकीय संघर्ष टोकाला गेलेला असताना, ईडीने मंत्री परब यांना नोटीस जारी केली आहे. कायद्याची लढाई आम्ही कायद्यानेच लढणार असल्याचे सांगत संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

Advertisement

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेची नुकतीच सांगता झाली. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याबाबत राणे यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे राज्यात चांगलाच गोंधळ झाला होता. त्यानंतर राणे यांना पोलिसांनी अटकही केली.

Advertisement

परब यांनीच त्यासाठी दबाव आणल्याचा आरोप भाजपने केला होता. आता या सर्व पार्श्वभूमीवर परब यांना ईडीने नोटीस आली असून, येत्या मंगळवारी (ता. 31 ) सकाळी 11 वाजता परब यांनी ईडी कार्यालयात हजर राहावे, असे त्यात बजावले आहे.

Advertisement

राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे, की “शाब्बास! जनआशीर्वाद जत्रेची सांगता होताच, अपेक्षेप्रमाणे अनिल परब यांना ईडीची नोटीस बजावण्यात आली. वरचे सरकार कामाला लागले. भूकंपाचा केंद्रबिंदू रत्नागिरीत होता. परब हे रत्नागिरीचे पालकमंत्री आहेत. chronology कृपया समज लिजीये. कायदेशीर लढाई कायद्यानेच लढू.. जय महाराष्ट्र..”

Advertisement

टोमॅटो उत्पादकांना दिलासा..! मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय.. शेतकऱ्यांचा कसा फायदा होणार पाहा..
राज्यात पुढील चार दिवस पावसाचा अंदाज, पाहा कुठे कोसळणार जलधारा, हवामान विभाग काय म्हणतोय..?

Advertisement
Advertisement

Leave a Reply