Take a fresh look at your lifestyle.

‘त्या’ अहवालाने चीनचा झालाय जळफळाट; पहा नेमके काय म्हटलेय आता परराष्ट्र मंत्रालयाने

चीनने माहिती देण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप या अहवालात आहे. मग अहवालामुळे चीनचा जळफळाट झालेला आहे.

बीजिंग : कोरोना विषाणूचा उगम कुठे झाला यावर वेळोवेळी चर्चा झाली आहे. याबाबत अमेरिकेच्या गुप्तचर संस्थांनी तयार केलेल्या अहवालावर चीन चांगलाच भडकला आहे. कारण, कोरोनाचा सगळा दोष चीनवर ढकलण्याच्या उद्देशाने या मुद्द्यास राजकीय वळण देण्यात येत आहे, असा चीनचा आरोप आहे. अमेरिकेने जर आरोप असेच सुरू ठेवले तर प्रत्युत्तराचीही तयारी ठेवावी, असा इशाराच थेट चीनने याप्रकरणी दिला आहे.

Advertisement

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी कोरोनाचे उत्पत्तीचे ठिकाण शोधून काढण्याचे आदेश दिलेले आहेत. में महिन्यात हे आदेश दिले होते. याचा फ़क़्त 90 दिवसात अहवाल देण्यासही त्यांनी सांगितले होते. त्यानुसार या संस्थांनी तपास केल्यावर त्यांना यात अपयश आले आहे. कारण, तपासणी अहवालात कोरोना विषाणूचा उगम कुठून झाला याबाबत काहीही स्पष्ट म्हटलेले नाही. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या अहवालात विशेष असे काहीही नाही. या अहवालात कोरोना विषाणू नैसर्गिक पद्धतीने फैलावला की प्रयोगशाळेतून हेच उत्तर दिलेले नाही. हा नेमका कसा लीक झाला याबाबत काहीही ठोस निष्कर्ष दिलेला नाही.

Advertisement

मात्र, चीनने माहिती देण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप या अहवालात आहे. मग अहवालामुळे चीनचा जळफळाट झालेला आहे. अहवालावर चीनने तीव्र आक्षेप नोंदवत अमेरिकेने या मुद्द्याचे राजकारण केल्याचा आरोप केला आहे. विषाणूचा उगम प्रयोगशाळेतून झाला असे म्हणणे असेल तर जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) पथकाने अमेरिकेच्या फोर्ट डेट्रिक प्रयोगशाळेलासुद्धा भेट देण्याची गरज आहे. कारण, या प्रयोगशाळेतसुद्धा विषाणूंवर अभ्यास सुरू आहे, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे महासंचालक फू कुंग यांनी याबाबत म्हटले आहे.

Advertisement

दरम्यान, कोरोनाचा पहिला रुग्ण चीनमध्ये सापडला असतानाच हा आजार चीनमध्ये बऱ्याच आधीपासून फैलावला होता असे म्हटले जात आहे. मात्र, चीनने याची माहिती अजिबात जगास दिली नाही. तसेच अन्य महत्वाची माहितीही कळणार नाही याचीही काळजी घेतली. तसेच या आजाराची माहिती उशीरा दिल्यावर हा घातक विषाणू जगभरात वेगाने पसरला. तसेच चीनच्या इतर कारवायांमुळे जगाचा चीनवरील संशय आणखी बळावला आहे. कोरोना विषाणूचा उगम चीनमधूनच झाल्याचा आरोपही होत असला तरी चीनने हे आरोप कधीच मान्य केलेले नाहीत.

Advertisement
Advertisement

Leave a Reply