Take a fresh look at your lifestyle.

राज्यात पुढील चार दिवस पावसाचा अंदाज, पाहा कुठे कोसळणार जलधारा, हवामान विभाग काय म्हणतोय..?

पुणे : पावसाने विश्रांती घेताच, राज्यातील हवामानात झपाट्याने बदल झाला आहे. दोनच दिवसांपूर्वी सरासरीखाली असणारे राज्यातील दिवसाचे कमाल तापमान आता सरासरीच्या पुढे गेलेय. काही ठिकाणी ते सरासरीपेक्षा ४ ते ५ अंशांनी वाढल्याचे दिसत आहे. त्यामुळे उन्हाचा चटका आणि उकाड्यातही अचानक वाढ  झालीय.

Advertisement

ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून राज्यात सर्वत्र पावसाळी स्थिती निर्माण झाली होती. दुसऱ्या नि तिसऱ्या आठवड्यापर्यंत अनेक भागात कमी-अधिक प्रमाणात पावसाने हजेरीही लावली होती. त्यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत असताना, अचानक पावसाने उसंत घेतली.

Advertisement

https://platform.twitter.com/widgets.js

Advertisement

दरम्यान, भारतीय हवामान विभागाने आता शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. ते म्हणजे राज्यात उद्यापासून (ता. 29) चार दिवस पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. राज्यात ३० ऑगस्टपासून पावसाचा जोर वाढणार आहे. त्यात परभणी, नाशिक, ठाणे, रायगडसह पालघर जिल्ह्यांना ‘ऑरेंज अ‍ॅलर्ट’ देण्यात आलाय.

Advertisement

मराठवाड्यासह विदर्भातही पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात तयार होणाऱ्या कमी दाबाचे क्षेत्र, त्याचा पश्चिम व मध्य भारतातून प्रवासाची शक्यतेमुळे महाराष्ट्रात येत्या चार ते पाच दिवसात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Advertisement

येत्या 10 दिवसांत मंदिरे उघडा, नाहीतर.. अण्णा हजारे यांचा राज्य सरकारला निर्वाणीचा इशारा..!
टोमॅटो उत्पादकांना दिलासा..! मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय.. शेतकऱ्यांचा कसा फायदा होणार पाहा..

Advertisement
Advertisement

Leave a Reply