Take a fresh look at your lifestyle.

आणि महिलेला व्हॉट्सअॅपवर लागला ३.११ लाखांना चुना, पहा व्हॉट्सअॅपवर काय केले तिने?

पोलिसांनी अनेक वेळा सुचीत केले आहे की, पुर्ण माहिती न घेता संशयास्पद लिंकवर क्लिक करू नये. परंतू त्या महिलेने त्या लिंकवर क्लिक केले.

मुंबई : सध्या डिजिटल माध्यमांमुळे आपण अनेक वेळा ऑनलाईन फसवणूक होताना पाहिली आहे. पोलिसांनी सतर्क केल्यानंतरही अनेक जण डिजिटल फसवणूकीला बळी पडतात, अशाच प्रकारे व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून एक फसवणूकीचा प्रकार समोर आला आहे.

Advertisement

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कांदिवली येथे राहणाऱ्या एका इंटेरियर डिजायनर महिलेने गेल्या आठवड्यात चारकोप पोलिस स्थानकात फसवणूकीची तक्रार दाखल केली आहे. त्यामध्ये महिलेने असं म्हटलं आहे की, व्हॉट्सअॅपवर तिला एक लिंक मिळाली होती. त्यामध्ये काही टास्क दिले होते. ते पुर्ण केल्यानंतर एका नामांकित ऑनलाईन शॉपिंग पोर्टलच्या नावाने बक्षिस दिले जाणार असल्याचे म्हटले होते.

Advertisement

पोलिसांनी अनेक वेळा सुचीत केले आहे की, पुर्ण माहिती न घेता संशयास्पद लिंकवर क्लिक करू नये. परंतू त्या महिलेने त्या लिंकवर क्लिक केले. त्यानंतर युजर आयडी आणि पासवर्ड बनवण्यास सांगितले. त्यानुसार महिलेने खाते तयार केले. त्यात महिलेला बक्षिस म्हणून ६४ रूपये मिळाले. त्यानंतर महिलेला रिचार्ज करण्याचा टास्क दिला. हा टास्क पुर्ण केल्यानंतर महिलेला पुन्हा एकदा बक्षिस मिळाले.

Advertisement

त्यानंतर आणखी बक्षीस मिळवण्यासाठी महिलेला पैसे जमा करण्यास सांगितले. त्यानंतर त्या महिलेने उर्वरीत टास्क पुर्ण करण्यासाठी ३.११ लाख रूपये जमा केले . मात्र त्याबदल्यात महिलेला कोणतेही बक्षीस मिळाले नाही.  पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, अज्ञात व्यक्तीविरोधात आयपीसी कलम ४२० आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियमांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आली आहे. तसेच या फसवणूकीचा तपास पोलिस करत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

Advertisement

पोलिसांनी सुचित केले आहे…

Advertisement
  • कधीही आपला पासवर्ड, पिन नंबर व बँकेचे डिटेल्स कोणालाही देऊ नका.
  • कोणत्याही वैध कंपन्या व बँका तु्म्हाला फोन व ई-मेल वर माहिती विचारत नाहीत.
  • तुम्ही कुठे बाहेर असाल व ऑनलाईन शॉपिंग करत असाल तर सार्वजनिक वाय फायचा वापर करू नका.
  • डेबिट कार्ड ऐवजी क्रेडिट कार्ड आणि सिक्यूअर पेमेंट सर्विसचा वापर करा.
  • पैसे ट्रान्सफर करताना विश्वसनीय फर्मचा वापर करा.
  • अनोळखी व्यक्तीला पैसे पाठवू वा स्वीकारू नयेत.
  • कोणत्याही संशयास्पद लिंकवर क्लिक करू नका.
  • पुर्ण तपास न करता कोणत्याही सेवेसाठी पैसे पाठवू नयेत.
  • शॉपिंग आणि ब्राऊजिंगसाठी नेहमी विश्वसनीय आणि सेक्यअर साईट्सचा वापर करावा.

Advertisement

Leave a Reply