Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो.. तालिबान्यांनी दिलीय धमकी; पहा हत्यारे आणि गाड्यांबाबत नेमकी काय दिलीय चेतावणी

दिल्ली : अफगाणिस्तानवर ताबा मिळाल्यानंतर मुजोर तालिबानी आता सरकार स्थापन करण्याच्या तयारीत पूर्ण ताकदीने उतरले आहे. या दहशतवादी संघटनेच्या राजकीय शाखेच्या नेत्यांनी काबूलमध्ये सरकार स्थापनेबाबत अनेक बैठका घेतल्या आहेत. दरम्यान, तालिबानने अफगाण जनतेला सात दिवसांच्या आत आपली शस्त्रे आणि सरकारी वाहने यांना घेऊन आत्मसमर्पण करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानंतर कोणीही शस्त्रे आणि सरकारी वाहने घेऊन आढळला तर कडक कारवाई केली जाईल अशी धमकी त्यांनी दिली आहे.

Advertisement

तालिबानचे प्रवक्ते जबीहुल्ला मुजाहिद यांनी ट्वीट केले आहे की, “काबुल शहरातील ज्यांच्याकडे वाहने, शस्त्रे, दारूगोळा आणि इतर सरकारी वस्तू आहेत, त्यांनी स्वेच्छेने त्यांना एका आठवड्याच्या आत संबंधित इस्लामिक अमिरातीच्या अधिकाऱ्यांकडे सोपवावे. चेतावणीचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. दरम्यान, तालिबानचे दुसरे प्रवक्ते बिलाल करीमी यांनी दावा केला की, त्यांच्या गटाने शुक्रवारी काबूल विमानतळावर तीन महत्त्वाचे लष्करी ठिकाणे काबीज केली. काबुल विमानतळाच्या लष्करी बाजूच्या तीन महत्त्वाच्या जागा अमेरिकनांनी रिकामी केल्या आहेत आणि त्या इस्लामिक अमीरातच्या नियंत्रणाखाली आहेत. आता, अमेरिकन लोकांच्या मालकीचा फ़क़्त एक छोटासा भाग आहे.

Advertisement

Advertisement

तालिबानने अमेरिकेला ऑफर दिली आहे की, तो पूर्वीप्रमाणे काबूलमध्ये आपला दूतावास चालवू शकतो. यासाठी इस्लामिक अमीरात सरकारद्वारे दूतावासात सर्व सुविधा देखील पुरवल्या जातील. दुसरीकडे, अमेरिकेने आपल्या दूतावासाच्या उर्वरित कर्मचाऱ्यांना काबूल विमानतळाच्या लष्करी शाखेत हलवण्याची तयारी सुरू केली आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याच्या प्रवक्त्या नेस प्राइड यांनी सांगितले की, अमेरिका आपल्या आंतरराष्ट्रीय भागीदारांशी अफगाणिस्तानमध्ये राजकीय उपस्थितीबाबत चर्चा करत आहे, परंतु अंतिम निर्णय झालेला नाही.

Advertisement

दरम्यान, व्हाईट हाऊसने एक निवेदन जारी केले असून त्यात म्हटले आहे की, अमेरिका आणि मित्रदेशाच्या सैन्याने गेल्या 12 तासांमध्ये काबुल विमानतळावरून 4,200 लोकांना बाहेर काढले आहे. व्हाईट हाऊसने शुक्रवारी सांगितले की, 27 ऑगस्ट रोजी पहाटे 3:00 ते 27 ऑगस्ट रोजी दुपारी 3:00 पर्यंत एकूण 4,200 लोकांना काबूलमधून बाहेर काढण्यात आले. 12 यूएस लष्करी उड्डाणे (9 C-17s आणि 3 C-130s) मध्ये सुमारे 2,100 होते, तर 29 उड्डाणांमध्ये मित्रदेशांचे 2,100 लोक होते.

Advertisement
Advertisement

Leave a Reply