Take a fresh look at your lifestyle.

स्वप्नपूर्तीसाठी SBI ने आणलीय खास संधी; पहा कोणत्या शैक्षणिक योजनेसाठी मिळणार पटकन कर्ज

हे कर्ज परदेशी शिक्षणघेण्यासाठीचे कर्ज आहे. विशेषतः ज्यांना परदेशी महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये पूर्ण वेळ नियमित अभ्यासक्रम करायचा आहे.

मुंबई : स्वतःचे किंवा मुलांचे शिक्षण करणे म्हणजे मोठी जबाबदारी आहे. कारण, महागडे उच्च शिक्षण परवडण्याजोगे नाही. हेच लक्षात घेऊन स्टेट बँक ऑफ इंडिया यांनी शैक्षणिक कर्ज सुरू केली आहे. देशामध्ये विद्यापीठ किंवा महाविद्यालयच नव्हे तर परदेशातील उच्चशिक्षणदेखील यात समाविष्ट केले जाऊ शकते. असेच एक कर्ज आहे SBI Global Ad-Vantage Overseas Education Loan.

Advertisement

हे कर्ज परदेशी शिक्षणघेण्यासाठीचे कर्ज आहे. विशेषतः ज्यांना परदेशी महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये पूर्ण वेळ नियमित अभ्यासक्रम करायचा आहे. जे विद्यार्थी त्यांच्या करिअरचे ध्येय पूर्ण करण्यासाठी परदेशातील शिक्षणाला प्राधान्य देतात त्यांच्यासाठी हे एसबीआयकडून वित्तपुरवठा केला जातो. या कर्ज योजनेअंतर्गत नियमित पदवी अभ्यासक्रम, पदव्युत्तर अभ्यासक्रम, डिप्लोमा, परदेशी संस्था / विद्यापीठांचे प्रमाणपत्र / डॉक्टरेट अभ्यासक्रम आदि समाविष्ट आहेत. हे अभ्यासक्रम कोणत्याही विषयात असू शकतात.

Advertisement

यूएसए, यूके, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, युरोप, जपान, सिंगापूर, हाँगकाँग आणि न्यूझीलंड, युरोप (ऑस्ट्रिया, बेल्जियम, झेक प्रजासत्ताक, डेन्मार्क, इस्टोनिया, फिनलँड, फ्रान्स, जर्मनी, ग्रीस, आयर्लंड, इटली, नेदरलँड्स, नॉर्वे, पोलंड, पोर्तुगाल, रशिया, स्पेन, स्वीडन, स्वित्झर्लंड, युनायटेड किंगडम) या देशात कोणत्याही शाखेतील महाविद्यालये आणि विद्यापीठ यांच्याकडे शिक्षण घेण्यासाठी हे कर्ज मिळते. एसबीआय ग्लोबल एडव्हँटेज एज्युकेशन लोन अंतर्गत 7.50 लाख ते 1.50 कोटी रुपयांपर्यंत कर्ज मिळते. या कर्जावरील व्याजदर 8.65 टक्के आहे. एसबीआय महिला अर्जदारांना कर्जाच्या व्याजदरात 0.50 टक्के विशेष सवलत देते. यासाठी कोर्स कालावधी + स्थगिती कालावधी दरम्यान साधे व्याज आकारले जाईल. कर्जाचा परतफेड कालावधी 15 वर्षांपर्यंत आहे. हा कालावधी कोर्स पूर्ण झाल्यानंतर 6 महिन्यांनी याची परतफेड सुरू होईल.

Advertisement
समाविष्ट घटक
प्रवास खर्च
शिक्षण शुल्क
परीक्षा/ग्रंथालय/प्रयोगशाळा शुल्क
पुस्तके/उपकरणे/साधने/गणवेश/कॉम्प्युटर सारख्या अत्यावश्यक वस्तूंचा वाजवी खर्चात खर्च आणि प्रोजेक्ट वर्क/थीसिस/अभ्यास दौरा यासारख्या अतिरिक्त आवश्यकतांचा देखील कर्जासाठी विचार केला जाऊ शकतो (एकूण शिकवणी फीच्या 20% पेक्षा जास्त)
इतर खर्चासाठी कर्जाचा विचार केला जाऊ शकतो. जसे की कॉशन मनी / इमारत निधी / संस्थेची बिले / पावती यांच्याद्वारे परताव्यायोग्य ठेव (जर ते एकूण शिक्षण शुल्काच्या 10% पेक्षा जास्त नसेल)

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply