Take a fresh look at your lifestyle.

पुण्यातील दोन सहकारी बॅंकांवर ‘आरबीआय’कडून कारवाईचा बडगा, तुमचे खाते नाही ना या बॅंकेत..?

मुंबई : नागरी सहकारी बँकांकरीता असणाऱ्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल रिझर्व्ह बँकेने पुण्यातील दोन सहकारी बँकांवर दंडात्मक कारवाई केली. तसेच रिझर्व्ह बँकेने एका बिगर बँकिंग वित्त संस्थेवरही (एनबीएफसी) कारवाईचा बडगा उगारला आहे.

Advertisement

पुण्यातील जिजामाता महिला सहकारी बँकेसह मुस्लीम को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, या बॅंकांवर ही कारवाई करण्यात आली आहे. नागरी सहकारी बँकांशी संबंधित नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल जिजामाता महिला सहकारी बँकेला आरबीआयने ३ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. तर मुस्लिम को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडवर २ लाख रुपयांचा दंड आकारला आहे.

Advertisement

मुस्लीम को-ऑपरेटिव्ह बँकेने ग्राहकांच्या ‘केवायसी’संबंधित नियमांचे उल्लंघन केल्याचे रिझर्व्ह बँकेच्या निदर्शनास आढळून आल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे समजले.

Advertisement

तसेच बिगर बँकिंग वित्त संस्था (एनबीएफसी) असलेल्या तमिळनाडू राज्यातील तिरुनेलवेली येथील सेयाद शरियत फायनान्स लिमिटेड या ‘एनबीएफसी’ला ५ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. ग्राहकांच्या ‘केवायसी’संबधी नियमांचे उल्लंघन केल्यानेच या वित्त संस्थेवर ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

Advertisement

नागरी सहकारी बँकांनी इतर बँकांमध्ये ठेवी ठेवण्यासंदर्भातील नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी या महिन्यातच रिझर्व्ह बँकेने नाशिकमधील जनलक्ष्मी को ऑपरेटिव्ह बँकेला ५० लाख ३५ हजारांचा दंड केला होता.

Advertisement

रिझर्व्ह बँकेने ३१ मार्च २०१९ रोजी जनलक्ष्मी को -ऑपरेटिव्ह बँकेच्या आर्थिक ताळेबंदाचे परीक्षण केले असता, त्यात बँकेने इतर बँकेत ठेवी ठेवताना नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळून आले.  त्यामुळे ही कारवाई करण्यात आली होती.

Advertisement

टोमॅटो उत्पादकांना दिलासा..! मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय.. शेतकऱ्यांचा कसा फायदा होणार पाहा..
या चुका टाळा, नाहीतर बॅंकांच्या कर्जाला कायमचे मुकाल.. काय दक्षता घ्याल, वाचा..

Advertisement
Advertisement

Leave a Reply