Take a fresh look at your lifestyle.

येत्या 10 दिवसांत मंदिरे उघडा, नाहीतर.. अण्णा हजारे यांचा राज्य सरकारला निर्वाणीचा इशारा..!

नगर : राज्य सरकारने दारूची दुकाने, हॉटेल उघडी केली. तेथे होणाऱ्या गर्दीमुळे कोरोना वाढत नाही का? मग सरकारला राज्यातील मंदिरे उघडण्यात काय अडचण आहे? जेथून सात्विक विचार मिळतात, त्यातून माणसे घडतात, अशी मंदिरे बंद करून सरकारने काय मिळविले? पुढील 10 दिवसांत सरकारने मंदिर उघडण्याबाबत निर्णय न घेतल्यास ‘जेल भरो’ आंदोलन करण्याचा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) यांनी दिला आहे.

Advertisement

नगरमधील मंदिर बचाव कृतिसमितीने राळेगणसिद्धी येथे जाऊन हजारे यांची भेट घेतली. राज्यातील सर्व मंदिरे उघडण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करण्याबाबत हजारे यांना साकडे घातले.

Advertisement

शिष्टमंडळासोबत बोलताना हजारे म्हणाले, की राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी आता जनतेनेच रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे. मंदिर बचाव कृतिसमितीने मंदिरे उघडण्यासाठी मोठे आंदोलन उभारावे, त्यात मी स्वतः सहभागी होईल. सरकारचे हे धोरण बरोबर नाही. येत्या 10 दिवसांत मंदिरे उघडण्याचा निर्णय सरकारने न घेतल्यास मोठे ‘जेल भरो’ आंदोलन करा, मी तुमच्या बरोबर असेल.

Advertisement

हजारे पुढे म्हणाले, की ‘भरकटत चाललेल्या समाजाला फक्त मंदिरेच तारू शकतात, यावर माझा विश्वास आहे. मी आज जो काही आहे, ते केवळ मंदिरामधून मिळालेल्या संस्कारामुळेच..! आज माझे 84 वय झाले, तरी माझ्यावर एवढासाही डाग नाही. हा मंदिरातून मिळालेल्या संस्काराचाच परिणाम आहे.’

Advertisement

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीजवळ जाऊन तुळशीची माळ घालून वारकरी झालोय. संतांचे विचार देणारी मंदिरे का बंद केली? सरकारला संतांचे विचार काय समजले? त्यामुळे सरकारने आपले धोरण बदलावे व त्वरित मंदिरे उघडावीत, अशी मागणी अण्णांनी केली आहे.

Advertisement

दरम्यान, मंदिर बचाव कृतिसमितीचे प्रमुख वसंत लोढा यांनी समितीने यापूर्वी केलेल्या विविध आंदोलनाची माहिती दिली. तसेच, आगामी काळात अण्णांच्या नेतृत्वाखाली मंदिरे उघडण्यासाठी तिव्र आंदोलन करणार असल्याचेही ते म्हणाले. निवेदनावर विशाल गणपती मंदिराचे अध्यक्ष अभय अग्गारकर व शिर्डी साईबाबा देवस्थानचे माजी ट्रस्टी सचिन तांबे यांच्या सह्या आहेत.

Advertisement

शिष्ठमंडळात मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुनील पंडित, ओबीसी जनमोर्चाचे अध्यक्ष बाळासाहेब भुजबळ, श्री शिव प्रतिष्ठानचे बापू ठाणगे, बाळासाहेब खताडे, गणेश पलंगे आदींचा समावेश होता.

Advertisement

बाब्बो.. किराणा सामानाची पिशवी तब्बल 1.5 लाखाला..! पहा लोकांच्या काय आहेत प्रतिक्रीया..
टोमॅटो उत्पादकांना दिलासा..! मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय.. शेतकऱ्यांचा कसा फायदा होणार पाहा..

Advertisement
Advertisement

Leave a Reply