Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो.. किराणा सामानाची पिशवी तब्बल 1.5 लाखाला..! पहा लोकांच्या काय आहेत प्रतिक्रीया..

Balenciaga पॅरीस येथील एक लग्जरी  ब्रँड (Luxury Brand ) आहे. जेथे या बॅगेची किंमत 2090 डॉलर म्हणजेच जवळपास 1 लाख 54 हजार 903 रूपये आहे.

मुंबई : तुम्ही महाराष्ट्रात किंवा चेन्नईत जन्मला असाल तर लहानपणापासून आई-वडील-आजी हे किराणा व भाजीपाला वायरच्या किंवा कापडी पिशवीतून आणताना पाहिला असेल. मात्र जगभरात असे काही ब्रँड आहेत की, ज्यांच्या किंमती ऐकून तुम्ही हैराण होऊ शकता. सामान्य पिशवीप्रमाणे दिसणारी पिशवी  अव्वा च्या सव्वा किंमतीला विकली जाते.

Advertisement

सध्या Balenciaga नावाचा नामांकित लग्झरी ब्रँड ‘देशी किराणा मालाची पिशवी’ लाखोे रूपयांना विकत आहे. ज्याकडे पाहून लोक म्हणतात की, भारतात अशा पिशव्या १५० ते ३०० रूपयांना मिळतात.

Advertisement

Advertisement
View this post on Instagram

Advertisement

A post shared by SAHARSH (@whysaharsh)

Advertisement

Advertisement

इंस्ट्राग्राम युजर @whysaharsh याने पिशवीची किंमत सांगताना बॅगचा फोटो शेअर केला आहे.  तर त्याने ‘Balenciaga ही बॅग (pishavi) 2000 डॉलरला विकत असल्याचे कॅप्शन दिले आहे. तसेच हे असं काहीतरी आहे की ज्याबाबत मी विचारही केला नव्हता, असं म्हणून त्याने आश्चर्य व्यक्त केले आहे.

Advertisement

त्यावर अनेक युजर्सने प्रतिक्रीया दिल्या आहेत. त्यात एका युजर्सने लिहीले आहे की, माझ्याकडे 6 पडल्या आहेत. द्या 2000 डॉलर. तर आणखी एका युजर्सने प्रतिक्रीया देतांना म्हटले आहे की, माझी आई, आजी, काकू यांच्याकडे यापेक्षा चांगले कलेक्शन आहे.

Advertisement

Balenciaga पॅरीस येथील एक लग्जरी  ब्रँड (Luxury Brand ) आहे. जेथे या बॅगेची किंमत 2090 डॉलर म्हणजेच जवळपास 1 लाख 54 हजार 903 रूपये आहे. तर कंपनीच्या वेबसाईटवर विविध प्रिंट आणि रंगाच्या बॅग उपलब्ध आहेत.

Advertisement
Advertisement

Leave a Reply