Take a fresh look at your lifestyle.

असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी ई-श्रम पोर्टल सुरु, काय फायदा होणार, वाचा..

नवी दिल्ली : देशातील असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी मोदी सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. देशात आतापर्यंत असंघटित क्षेत्रातील कामगारांचा कोणताही अचूक डेटा नव्हता. त्यामुळे सरकारी योजनांचा लाभ कामगारांपर्यंत पोहोचत नव्हता. ही कमतरता दूर करण्यासाठी मोदी सरकारने ई-श्रम पोर्टल सुरू केले आहे. या पोर्टलवर कामगारांची संपूर्ण माहिती नोंदविली जाणार आहे.

Advertisement

देशात सध्या ३८ कोटींहून अधिक असंघटित कामगार असून, त्यांची आता या पोर्टलवर मोफत नोंदणी केली जाणार आहे. कामगारांना कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएससी) वा इतर कुठल्याही नोंदणीसाठी पैसा द्यावा लागणार नाही.

Advertisement

श्रम आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी गुरुवारी (ता. २६) ई-श्रम पोर्टल लाॅंच केले. या पोर्टलवर केवळ असंघटित कामगारांची नोंदणी केली जाणार नाही, तर केंद्र व राज्य सरकार यांच्यामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध सामाजिक सुरक्षा योजनांचे लाभही मिळणार असल्याचे मंत्री भूपेंद्र यादव यांनी सांगितले.

Advertisement

ई-श्रम (eSHRAM) पोर्टलवर नोंदणीकृत असंघटित कामगाराला २ लाख रुपयांचे अपघाती विमासंरक्षण मिळणार आहे. अपघातात मृत्यू झाल्यास वा कायमस्वरूपी अपंगत्व आले, तर २ लाख रुपये नि अंशतः अपंगत्वासाठी १ लाख रुपये मिळण्यासाठी हा कामगार पात्र असणार आहे.

Advertisement

सर्व असंघटित कामगारांच्या राष्ट्रीय डेटा बेसची निर्मिती केलेली आहे. या मोहिमेचा भाग होण्यासाठी आणि सर्व असंघटित कामगारांना ई-श्रम पोर्टलवर नोंदणीकृत करण्यासाठी आणि “छूटेगा नहीं कोई कामगार, योजनाएं पहुचेंगी सबके द्वार” हे भारत सरकारचे ध्येय पूर्ण करण्यासाठी भागीदार बना, असे आवाहन श्रम आणि रोजगार आणि पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी केले.

Advertisement

नोंदणी कशी होणार?
कामगारांना एक ई-श्रम कार्ड दिले जाईल, ज्यात त्यांना 12 क्रमांकाचा युनिक कोड असेल. हा कोड त्या कामगाराला ओळखेल. या संहितेच्या आधारे कामगारांना सरकारी योजनांचा लाभ दिला जाईल. या पोर्टलद्वारे सरकार बांधकाम कामगार, स्थलांतरित कामगार, रस्त्यावरील विक्रेते आणि घरगुती कामगार, अशा 38 कोटी असंघटित क्षेत्रातील कामगारांची नोंदणी करणार आहे.

Advertisement

कामगार मंत्रालय पोर्टलवर कामगारांची नोंदणी करण्यात मदत करील. त्यात राज्य सरकार, कामगार संघटना आणि सामान्य सेवा केंद्रही मदत करतील. श्रम पोर्टलसाठी राष्ट्रीय टोल फ्री क्रमांक 14434 आहे. त्यावर कामगार कॉल करून नोंदणीशी संबंधित सर्व माहिती मिळवू शकतात. नोंदणीमध्ये काही अडचण असल्यास टोल फ्री क्रमांकावर उपाय देखील सांगितले जाणार आहेत.

Advertisement

आधी पैसा, मग वीज..! आता वीज मीटरचाही मोबाईलप्रमाणे रिचार्ज करावा लागणार, मोदी सरकारची नवी योजना..
सोन्याच्या भावात वाढ, चांदी कोसळली, भविष्यातील किमतीबाबत तज्ज्ञ काय म्हणतात पाहा..?

Advertisement
Advertisement

Leave a Reply