Take a fresh look at your lifestyle.

आहात ना तयार.. आलीय पैसे कमावण्याची संधी; पहा काय करावे लागेल त्यासाठी

एएमआय ऑर्गेनिक्स ही एक विशेष रसायन कंपनी आहे. विजया डायग्नोस्टिक सेंटर ही आरोग्यसेवा क्षेत्रातील कंपनी आहे. म्हणजेच ही पैसे कमावण्याची संधी आहे.

पुणे : शेअर बाजारात गुंतवणूकदारांकडून निधी गोळा करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कंपन्यांची संख्या वाढत आहे. अनेक कंपन्या आपला IPO (इनिशियल पब्लिक ऑफरिंग) आणत आहेत. सप्टेंबरच्या महिन्याच्या पहिल्या दिवशी दोन कंपन्या त्यांचा आयपीओ आणत आहेत. या दोन कंपन्या AMI ऑर्गेनिक्स आणि विजया डायग्नोस्टिक सेंटर आहेत. एएमआय ऑर्गेनिक्स ही एक विशेष रसायन कंपनी आहे. विजया डायग्नोस्टिक सेंटर ही आरोग्यसेवा क्षेत्रातील कंपनी आहे. म्हणजेच ही पैसे कमावण्याची संधी आहे.

Advertisement

एएमआय ऑर्गेनिक्सने 570 कोटी रुपयांच्या आयपीओसाठी 603-610 रुपये अशी प्रतिशेअर किंमत निश्चित केली आहे. हा आयपीओ 1 सप्टेंबरला उघडेल आणि 3 सप्टेंबरला बंद होईल. आयपीओमध्ये 200 कोटी रुपयांच्या इक्विटी शेअर्सचे नवीन इश्यू समाविष्ट आहे. तर 60,59,600 इक्विटी शेअर्सची ऑफर फॉर सेल (ओएफएस) विद्यमान भागधारकांद्वारे केली जाईल. एएमआय ऑर्गेनिक्सने प्री-आयपीओ प्लेसमेंटमधून 100 कोटी रुपये उभारले आहेत. त्यानंतर या नवीन इश्यूचा आकार 300 कोटी रुपयांवरून 200 कोटी रुपये करण्यात आला आहे. आयपीओमधून मिळणारी रक्कम कर्जाची परतफेड आणि कार्यरत भांडवलाच्या गरजांसाठी वापरली जाईल, असे कंपनीने म्हटलेले आहे.

Advertisement

तर, विजया डायग्नोस्टिक सेंटर हे 1,895 कोटी रुपयांचे भांडवल उभारण्यासाठी IPO लाँच करत आहे. तोही 1 सप्टेंबर रोजी उघडेल आणि 3 सप्टेंबर रोजीच बंद होईल. या अंतर्गत ऑफर किंमत 522-531 रुपये प्रतिशेअर निश्चित करण्यात आली आहे. IPO संपूर्ण ऑफर ऑफ सेल (OFS) च्या स्वरूपात आहे. ज्यामध्ये प्रवर्तक डॉ. एस. सुरेंद्रनाथ रेड्डी आणि इतर गुंतवणूकदार त्यांचे भागभांडवल विकणार आहेत. या आयपीओमुळे प्रवर्तक आणि विद्यमान भागधारकांची भागीदारी 35 टक्क्यांनी कमी होईल. सध्या बाजारात अभूतपूर्व अशी तेजी आहे. त्यामुळे अनेक IPO ना आणि पर्यायाने गुंतवणूकदारांना अच्छे दिन आलेले आहेत. ही संधी अशीच असू शकते. मात्र, आपण त्यासाठी अभयस करून किती आणि कशी गुंतवणूक करावी याचा निर्णय घ्यावा.

Advertisement
Advertisement

Leave a Reply