Take a fresh look at your lifestyle.

टोमॅटो उत्पादकांना दिलासा..! मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय.. शेतकऱ्यांचा कसा फायदा होणार पाहा..

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून देशात टोमॅटोचे (Tomato) भाव मातीमाेल झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. अक्षरक्ष: 25 पैसे किलोने टाेमॅटो विकण्याची वेळ आल्याने, शेतकरी बाजार समितीच्या आवारात टोमॅटो फेकून देऊन सरकारच्या नावाने शिमगा करीत आहेत. त्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Advertisement

अखेर मोदी सरकारने या टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. एमआयएस (MIS-Market Intervention Scheme) योजनेंतर्गत राज्य सरकारांनी शेतकऱ्यांकडून टोमॅटो खरेदी करावेत, अशी सूचना मोदी सरकारने सर्व राज्यांना केली आहे.

Advertisement

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी पियुष गोयल आणि केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांच्याशी याबाबत चर्चा केली. महाराष्ट्रातील शेतकरी सध्या टोमॅटोचे दर कोसळल्याने आक्रमक झाले आहेत. या पार्श्वभूमीवर भारती पवार यांनी केंद्रातील संबंधित मंत्र्यांशी संपर्क साधूव त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.

Advertisement

राज्य सरकारांनी MIS योजनेंतर्गत टोमॅटो खरेदी करून त्याची विक्री करण्याची जबाबदारी स्वीकारावी, अशी सूचना केंद्र सरकारने सर्व राज्यांना केली आहे. या व्यवहारात राज्य सरकारला होणाऱ्या तोट्यातील 50 टक्के वाटा केंद्र सरकार राज्याला देईल, अशी माहिती भारती पवार यांनी दिली.

Advertisement

राज्य सरकारने केंद्राला याबाबतचा प्रस्ताव पाठविण्याची विनंतीदेखील त्यांनी केली आहे. त्याचप्रमाणे टोमॅटोची निर्यात सुरूच असून, ती बंद केलेली नसल्याचं स्पष्टीकरणही त्यांनी दिलं.

Advertisement

दरम्यान, यंदा महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात टोमॅटो उत्पादन झालेले असताना त्या प्रमाणात मागणी नाही. त्यामुळे टोमॅटोचे भाव उतरले आहेत. त्यातून उत्पादनखर्चही निघत नसल्याने शेतकरी आपला माल रस्त्यावर फेकून देत असल्याचं चित्र महाराष्ट्रात ठिकठिकाणी दिसत आहे.

Advertisement

नाशिकमधील शेतकऱ्यांनी टोमॅटोनं भरलेले क्रेट्स फेकून दिल्याची घटना नुकतीच घडली होती. त्यानंतर केंद्र सरकारकडून घेण्यात आलेला हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.

Advertisement

या चुका टाळा, नाहीतर बॅंकांच्या कर्जाला कायमचे मुकाल.. काय दक्षता घ्याल, वाचा..
सोन्याच्या भावात वाढ, चांदी कोसळली, भविष्यातील किमतीबाबत तज्ज्ञ काय म्हणतात पाहा..?

Advertisement
Advertisement

Leave a Reply