Take a fresh look at your lifestyle.

‘या’ चुका टाळा, नाहीतर बॅंकांच्या कर्जाला कायमचे मुकाल.. काय दक्षता घ्याल, वाचा..

नवी दिल्ली : अनेकदा आपणास कर्जासाठी बॅंकांचे उंबरठे झिजविण्याची वेळ येते. अशा वेळी काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक असते, नाहीतर त्याचा मोठा फटका बसू शकतो. बॅंकांकडून कर्ज घेताना, वा घेतल्यावरही अनेक जणबेफिकिर होतात. मात्र, त्याचा तोटा भविष्यात होऊ शकतो.

Advertisement

आता जरी एखादी गोष्ट लहान वाटत असली, तरी पुढे जाऊन तिच तुमच्यासाठी मोठा अडथळा ठरु शकते. त्यामुळे बँक, क्रेडिट कार्ड किंवा कर्जासंबंधी कोणतेही व्यवहार करताना काय काळजी घ्यायला हवी, याबाबत जाणून घेऊ या..

Advertisement

कर्जासाठी बॅंकेत गेल्यावर सुरुवातीलाच तुमचा क्रेडिट स्कोअर तपासला जातो. आर्थिक व्यवहारांनुसार क्रेडिट स्कोअर निश्चित केला जातो. सिबिल, इक्विफॅक्स, हायमार्क यांसारख्या संस्था ग्राहकांच्या आर्थिक गोष्टींचा तपशील नोंदवित असतात. 300 ते 900 मध्ये तुमचा क्रेडिट स्कोअर मोजला जातो. कर्ज मिळविण्यासाठी तुमचा क्रेडिट स्कोअर किमान 750 असणे आवश्यक आहे. हा स्कोअर जितका जास्त, तितके जास्त कर्ज तुम्हाला मिळते. त्यामुळे क्रेडिट स्कोअर मेंटेन ठेवण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे असते.

Advertisement

कर्जाचे हप्ते वेळेवर न फेडल्यास तुमच्या क्रेडिट स्कोअरवर परिणाम होऊ शकतो. तुम्ही किती वेळेत हप्ते भरता, यावर लक्ष असते. त्यामुळे कर्जाचे हप्ते भरण्यात चालढकल करणे भविष्यात महागात पडू शकते.

Advertisement

वेगवेगळ्या बँकांमध्ये क्रेडिट कार्ड वा कर्जासाठी अर्ज केल्यास ही गोष्ट चांगली नाही. तुमच्या आर्थिक स्थितीत काहीतरी त्रूटी असल्याचा समज त्यातून होऊ शकतो. कोणतेही कर्ज घेण्यापूर्वी हा तपशील पाहिला जातो. एखाद्या बँकेच्या क्रेडिट कार्डासाठी अप्लाय केले, नि अगोदरच्या क्रेडिट कार्डाचे हप्ते थकले असल्यास क्रेडिट स्कोअर कमी होतो.

Advertisement

क्रेडिट कार्डावर महागडी गोष्ट खरेदी केल्यास त्याचे बिल तात्काळ भरा. तुम्ही पूर्ण हप्ता न भरता मिनिमम ड्यूज भरत राहिलात, तर कर्जाच्या विळख्यात अडकू शकता. एका महिन्याचे व्याज दुसऱ्या महिन्यात ट्रान्सफर होत राहिले, तर तुमचा क्रेडिट स्कोअर कमी होतो. त्यामुळे क्रेडिट युटिलायझेन रेट नेहमी 30 टक्क्यांच्या आसपास राहील, याची काळजी घ्या.

Advertisement

क्रेडिट कार्डाची लिमिट वाढवणे, हे युटिलायझेशन रेट वाढवण्याच्यादृष्टीने चांगले ठरते. मात्र, तुम्ही क्रेडिट लिमीट कमी केलीत तर हा रेटही घटतो. एखादे कर्ज वेळेआधी फेडल्यावर तुम्ही निर्धास्त होता. मात्र, त्याचा विपरित परिणाम क्रेडिट स्कोअरवर होतो. त्यामुळे याबाबत दक्षता घेणे गरजेचे आहे.

Advertisement

आधी पैसा, मग वीज..! आता वीज मीटरचाही मोबाईलप्रमाणे रिचार्ज करावा लागणार, मोदी सरकारची नवी योजना..
असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी ई-श्रम पोर्टल सुरु, काय फायदा होणार, वाचा..

Advertisement
Advertisement

Leave a Reply