Take a fresh look at your lifestyle.

आधी पैसा, मग वीज..! आता वीज मीटरचाही मोबाईलप्रमाणे रिचार्ज करावा लागणार, मोदी सरकारची नवी योजना..

नवी दिल्ली : देशभरातील वीज ग्राहकांसाठी एक महत्वाची बातमी आहे. घरगुती वीज मीटर आता बदलण्यात येणार असून, त्याऐवजी प्रीपेड स्मार्ट इलेक्ट्रिक मीटर बसविण्यात येणार आहे. याबाबत मोदी सरकारकडून अधिसूचना जारी करण्यात आलीय. त्यानुसार, सुरुवातीच्या टप्प्यात भारतातील प्रमुख शहरांमध्ये 100 टक्के नवे मीटर बसविण्यात येणार आहेत.

Advertisement

विशेषत: ज्या शहरांत AT&C (एकूण तांत्रिक आणि व्यावसायिक) नुकसान 2019-2020 मध्ये 15 टक्क्यांपेक्षा जास्त आहे, तेथे प्रीपेड स्मार्ट मीटर बसवण्याची अंतिम मुदत डिसेंबर-2023 पर्यंत निश्चित करण्यात आलीय. मार्च 2025 पर्यंत देशात सर्वत्र प्रीपेड मीटर बसविले जाणार आहेत. जेथे उच्च प्रसारणाचे नुकसान जास्त आहे, अशा ठिकाणी पहिले काम करण्यात येणार आहे.

Advertisement

कोणत्याही प्रीपेड मोबाईल नंबरप्रमाणेच हे वीज मीटर काम करणार आहेत. घरातील वीजपुरवठा सुरु करण्यासाठी तुम्हाला आधी प्रीपेड स्मार्ट इलेक्ट्रिक मीटरचा रिचार्ज करावा लागणार आहे. रिचार्जची मुदत संपताच मोबाईलप्रमाणे तुमचा वीजपुरवठाही आपोआप बंद केला जाणार आहे.

Advertisement

मोबाईलमध्ये रिचार्जची तारीख जवळ आल्यावर जसा ग्राहकांना अलर्ट पाठविला जातो, त्याच प्रकारे विजेच्या ग्राहकांना अलर्ट पाठविला जाईल. त्यानंतर तुम्हाला तातडीने तुमचे मीटर रिचार्ज करावे लागेल. हे रिचार्ज स्वयंचलित वा मॅन्युअलीही करता येणार आहे.

Advertisement

दिल्लीसारख्या शहरातील ग्राहक मोबाईल रिचार्जप्रमाणेच ऑनलाईन वा ऑफलाईन पद्धतीने वीज मीटर रिचार्ज करू शकतात. दिल्लीतील व्यावसायिक संस्था आधीच इलेक्ट्रिक स्मार्ट मीटर वापरत आहेत. गेल्या दोन वर्षांपासून दिल्लीतील भाडेकरू प्री-पेड मीटर निवडण्यास मोकळे आहेत, जे ऑनलाईन आकारले जातात. अशा वीजबिलामुळे भाडेकरू आणि जमीनदार यांच्यातील वाद टाळण्यास मदत होते.

Advertisement

दिल्ली सरकारने ग्राहकांना दरमहा 200 युनिट वीज पूर्णपणे मोफत केलीय. प्री-पेड स्मार्ट मीटरची सर्वात मोठी समस्या आहे, त्याची किंमत. हे मीटर सध्याच्या मीटरच्या तुलनेत 4 ते 5 पट महाग असणार आहेत. त्यामुळे छोट्या ग्राहकांना असे महागडे मीटर बसविण्यात अडचणी येऊ शकतात.

Advertisement

एकदा ही योजना लागू झाल्यावर ग्राहकांना जीनस, एल अँड टी आणि एल अँड जी सोबत इतर कंपन्यांनी तयार केलेले मीटर खरेदी करता येणार आहेत. नवीन मीटर मोठ्या प्रमाणावर लावल्यास, कदाचित जुन्या कंपन्याही प्रीपेड मीटर तयार करण्यास सुरुवात करतील.

Advertisement

दिल्लीत विजेची मागणी 250 टक्क्यांनी वाढलीय. देशात AT&C तोटा 7.5 टक्क्यांवर आलाय, 2002 मध्ये हा आकडा 55 टक्क्यांपर्यंत होता. तज्ज्ञांच्या मते, दूरसंचार क्षेत्रातील प्रीपेड योजनेसाठी मिळालेल्या योजनेमुळे वीज क्षेत्राला प्रेरणा मिळाली आहे. दूरसंचार क्षेत्रात जे तत्त्व स्वीकारण्यात आले होते, तेच आता या क्षेत्रातही लागू केले जात आहे. यामुळे वीजचोरी शून्यावर आणता येणार आहे.

Advertisement

फ्लिपकार्ट देतेय 2 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज..! तुमचा कसा होणार फायदा पाहा..?
श्रीगोंद्याच्या नागवडे कारखान्यामध्ये हुकुमशाही; पहा मगर यांनी नेमके काय आरोप केलेत

Advertisement
Advertisement

Leave a Reply