Take a fresh look at your lifestyle.

सोन्याच्या भावात वाढ, चांदी कोसळली, भविष्यातील किमतीबाबत तज्ज्ञ काय म्हणतात पाहा..?

नवी दिल्ली : जागतिक अर्थव्यवस्थेत होणाऱ्या आर्थिक सुधारणांमुळे येत्या काही दिवसांत सोने-चांदीच्या किमती मोठ्या प्रमाणात घसरणार असल्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या किमतीत मोठी वाढ झाल्याचा परिणाम देशांतर्गत बाजारातही दिसत आहे. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत आज (शुक्रवारी) सोन्याच्या दरात 99 रुपये प्रति तोळ्यांनी वाढ झाली. सोन्याला झळाळी येत असताना, दुसरीकडे चांदीची चमक मात्र कमी झाल्याचे दिसले. चांदीचे भाव किलोमागे 32 रुपयांनी घसरले होते.

Advertisement

दिल्लीत आज 10 ग्रॅम सोन्याची किंमत 99 रुपयांनी वाढून 46,312 रुपये झाली. काल (गुरुवारी) 46,213 रुपये ताेळ्यावर सोन्याचा भाव बंद झाला होता. आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याची किंमत 1,798 डॉलर प्रति औंस राहिली.

Advertisement

दिल्ली सराफा बाजारात चांदीची किंमत 32 रुपयांनी घटून 61,667 रुपये प्रति किलो झाली. गेल्या ट्रेडिंग सत्रात चांदीची किंमत 61,699 रुपये प्रति किलोवर बंद झाली होती. आंतरराष्ट्रीय बाजारातही ही किंमत 23.66 डॉलर प्रति औंस होती.

Advertisement

दरम्यान, कोरोना महामारीच्या प्रभावानंतर, जगभरातील अर्थव्यवस्था सावरण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यात सुधारणाही दिसत आहे. जगातील सर्वात मोठी ब्रोकरेज फर्म यूबीएसचा असा विश्वास आहे, की येत्या काही दिवसांत सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण होऊ शकते. यूबीएसने सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांना याबाबत सावध केले आहे.

Advertisement

आधी पैसा, मग वीज..! आता वीज मीटरचाही मोबाईलप्रमाणे रिचार्ज करावा लागणार, मोदी सरकारची नवी योजना..
श्रीगोंद्याच्या नागवडे कारखान्यामध्ये हुकुमशाही; पहा मगर यांनी नेमके काय आरोप केलेत

Advertisement
Advertisement

Leave a Reply