Take a fresh look at your lifestyle.

‘गुगल’ सुरु करणार एफडी योजना, गुंतवणुकीवर किती व्याज मिळणार, ग्राहकांचा होणार असा परिणाम..!

मुंबई : भारतात गुंतवणुकीसाठी लोकप्रिय योजनांपैकी एक पद्धती म्हणजे, एफडी अर्थात मुदत ठेव. त्या माध्यमातून केलेली गुंतवणूक सुरक्षित राहते, शिवाय चांगला व्याजदर मिळत असल्याने गुंतवणुकदारांचाही फायदा होतो. बँका, बिगरबँकिंग वित्तीय संस्थांमध्ये एफडी करणाऱ्यांचे प्रमाण मोठे आहे.

Advertisement

दरम्यान, आता ‘गुगल’नेही (Google) मुदतठेव योजना सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. केवळ भारतातील ग्राहकांसाठीच ‘गुगल’ने ही योजना सुरु केलीय. ग्राहक ‘गुगल पे’ (Google Pay) च्या माध्यमातून एफडी (FD) करु शकतात.

Advertisement

‘गुगल’ने ‘सेतू’ या फिनटेक कंपनीच्या साहाय्याने ही योजना सुरु केली आहे. या कंपनीच्या ‘एपीआय’च्या माध्यमातून ‘गुगल’ ग्राहकांना मुदत ठेवीची सेवा देणार आहे. मात्र, गुगल स्वत: ही स्कीम विकणार नाही. अन्य बँकांच्या एफडी ‘गुगल पे’च्या माध्यमातून थेट ग्राहकांना उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. त्यात सुरुवातीला ‘इक्विटॉस स्मॉल फायनान्स’ बँकेची मुदत ठेव योजना ग्राहकांसाठी उपलब्ध असेल.

Advertisement

किती व्याज मिळणार?
इक्विटॉस स्मॉल फायनान्स बँकेच्या एका वर्षाच्या मुदत ठेव योजनेवर 6.35 टक्के व्याज मिळेल. त्यात पैसे गुंतविण्यासाठी आधार क्रमांक देऊन केवायसी प्रक्रिया पूर्ण करता येईल. नंतर तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येईल. त्यासाठी सेतू कंपनीने एपीआयचे बीटा व्हर्जन तयार केले आहे. त्यामुळे आता लवकरच ही योजना ग्राहकांसाठी उपलब्ध होईल.

Advertisement

स्मार्टफोनवरुनही मुदत ठेव योजनेत पैसे गुंतविता येणार आहेत. सर्व प्रक्रिया स्मार्टफोनवरच पार पाडता येणार आहे. त्यामुळे भविष्यात ग्राहकांना ‘फिक्स डिपॉझिट’मध्ये पैसे गुंतवायचे झाल्यास बँकेत जाण्याची गरज पडणार नाही. थेट मोबाईल वॉलेटमधून पैसे फिक्स्ड डिपॉझिट योजनेत ट्रान्सफर करता येतील. विशेष म्हणजे,एफडी काढण्यासाठी ‘इक्विटॉस स्मॉल फायनान्स बँके’त तुमचे खाते असणेही गरजेचे नाही.

Advertisement

‘गुगल’कडून अन्य बँकांशीही फिक्स डिपॉझिट योजनेसाठी बोलणी सुरु आहेत. ‘गुगल पे’च्या माध्यमातून तुम्ही फिक्स्ड डिपॉझिटमध्ये पैसे गुंतवून पॉलिसीचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर पैसे थेट तुमच्या गुगल पे अकाऊंटमध्ये ट्रान्सफर केले जातील. त्यामुळे तुम्हाला ‘गुगल पे’ वगळता बँकांशी थेट संपर्क करावा लागणार नाही.

Advertisement

आगामी काळात ‘गुगल पे’ वर उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक आणि एयू स्मॉल फायनान्स बँकेच्या फिक्स्ड डिपॉझिट योजना उपलब्ध होण्याची शक्यता आहे. सध्या भारतात तब्बल 15 कोटी ‘गुगल पे’चे युजर्स आहेत. ‘गुगल पे’ कडून 7 ते 29 दिवस, 30 ते 45 दिवस, 91 ते 180 दिवस, 181 ते 364 दिवसांसाठी फिक्स्ड डिपॉझिट योजना सुरु करण्यात येणार असल्याचे समजले.

Advertisement

एमआयडीसीच्या भूखंडावरील बांधकामाबाबत लवकरच मोठा निर्णय, उद्योगमंत्र्यांनी पाहा काय म्हटलंय..?
चेकबाबत रिझर्व्ह बॅंकेचे नवे नियम पाहिले का..? नाहीतर बसू शकतो मोठा फटका..

Advertisement
Advertisement

Leave a Reply