Take a fresh look at your lifestyle.

‘एमआयडीसी’च्या भूखंडावरील बांधकामाबाबत लवकरच मोठा निर्णय, उद्योगमंत्र्यांनी पाहा काय म्हटलंय..?

मुंबई  : उद्योजकाला नवा उद्योग उभारण्यासाठी ‘एमआयडीसी’चा भूखंड मिळाला, की त्यावर दोन वर्षांत भूखंडाच्या क्षेत्रफळाच्या 40 टक्के जागेवर बांधकाम करावे लागते. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या विकास नियंत्रण नियमावलीनुसार ही अट घातलेली आहे. मात्र, सध्या बांधकामाच्या वाढलेल्या प्रचंड किमती, कोरोनामुळे अडचणीत आलेले उद्योग-धंदे पाहता दोन वर्षांत एवढी मोठी गुंतवणूक करणे लघुउद्योजकांना शक्य नाही. त्यामुळे सध्याच्या अडचणीत आर्थिक टंचाईमुळे ही अट शिथील करण्याची मागणी एमआयडीसी उद्योजकांनी केली होती.

Advertisement

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चरच्या शिष्टमंडळाने या मागणीसाठी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची नुकतीच भेट घेतली. त्यांच्या कानावर आपल्या अडचणी घातल्या. त्यावर उद्याेगमंत्री देसाई यांनी उद्योजकांनी दिलासा देताना, एमआयडीसी (MIDC) च्या भूखंडावर दोन वर्षांत 40 टक्के बांधकाम करण्याची अट 20 टक्क्यांपर्यंत शिथील करण्याचे आश्वासन दिले.

Advertisement

चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांच्या नेतृत्वाखाली उद्योजकांच्या शिष्टमंडळाने देसाई यांची भेट घेतली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्योजकांपुढील समस्यांबाबत चर्चा केली. बांधकामाबाबतची अडचण सांगितल्यावर देसाई यांनी उद्योजकांना दिलासा दिला.

Advertisement
एमआयडीसीमध्ये उद्योग सुरु करताना उद्योजकांना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या विविध बाबींची पूर्तता करावी लागते. चटईक्षेत्र निर्देशांक, इमारत पूर्णत्वाचा दाखला, ट्रान्सफर मुदतवाढ व अनुदान याबाबतच्या अडचणी उद्योजकांनी देसाई यांच्यासमोर मांडल्या.
महाराष्ट्र चेंबरतर्फे नाशिकला महिला उद्योजकांना क्लस्टरसाठी भूखंड मिळविण्याकरीता बऱ्याच वर्षांपासून प्रयत्न सुरु आहेत. उद्योग मंत्रालयाच्या महिला उद्योग प्रोत्साहन धोरणानुसार हा भूखंड द्यावा,  अशीही मागणी करण्यात आली.
 

उद्योग मंत्रालयाने सुरु केलेल्या प्रोत्साहन योजनेची (ॲमनेस्टी स्किम) माहिती उद्योग मंत्रालय व महाराष्ट्र चेंबरमार्फत राज्यातील उद्योजकांपर्यंत पोहचवावी व उद्योगांना फायदा मिळवून देणार असल्याचे देसाई यांनी या वेळी सांगितले.

Advertisement

शिष्टमंडळात आमदार चंद्रकांत जाधव, चेंबरचे वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी, विश्वस्त मंडळाचे चेअरमन आशिष पेडणेकर, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे, शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष अतुल पाटील आदींचा समावेश होता.

Advertisement

महागाईचा भडका..! महिनाभरात खाद्यतेलाची किंमत पाहा कितीने वाढलीय..?
चेकबाबत रिझर्व्ह बॅंकेचे नवे नियम पाहिले का..? नाहीतर बसू शकतो मोठा फटका..

Advertisement
Advertisement

Leave a Reply