Take a fresh look at your lifestyle.

‘त्या’ मुद्द्यावर शिवसेनेला मिळाले यश..? भाजपच्या मनसुब्याला ब्रेक..? पहा नेमके काय झालेय मुंबई महापालिका राजकारणात

मुंबई : आगामी मुंबई महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर डोळा ठेऊन राज्यात विरोधी पक्ष असलेल्या भाजपने आताच प्रचाराची राळ उडवून दिली आहे. मात्र, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटक आणि बेलवर सुटका प्रकरणाने याला वेगळेच आयाम मिळाले आहेत. यानिमित्ताने मुंबईत मराठी विरुध्द अमराठी असा वाद पेटवून शिवसेना पुन्हा एकदा आक्रमक होण्याची चिन्हे आहेत.

Advertisement

भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेत शिवसेना व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर रोजच्या रोज होणारी जहरी टीका केली जात आहे. अशावेळी सहा महिन्यांनी होणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीत मराठी मतांचे ध्रुवीकरण करण्यासाठीचे प्रकरण म्हणून राणे यांच्या अटकेकडे पाहिले जात आहे. निवडणुकीत मराठी मतांचे ध्रुवीकरण घडून येईल व त्याचा लाभ पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेला होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे. २८ वर्षे मुंबई पालिकेवर सेनेची सत्ता असून फेब्रुवारी २०२२ मध्ये होणाऱ्या निवडणुकीत मुंबईवर झेंडा फडकवण्याचा भाजपने चंग बांधला आहे. त्यालाच आता ब्रेक लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Advertisement

मुंबईत ४२ टक्के मराठी टक्का आणि हिंदी भाषिकांचा मत टक्का ३९ टक्के असून २०१७ च्या पालिका निवडणुकीत मराठी मतदारांत मोठी फाटाफूट पडल्याने निकालावर परिणाम दिसले होते. भाजपच्या ८४ नगरसेवकांत ४२ अमराठी नगरसेवक  आहेत म्हणजेच मुंबईतली भाजप अजूनही पूर्णपणे अमराठी असल्याचे मानले जाते. त्यामुळेच सत्ता आपल्याकडे खेचण्यासाठी भाजपने कोकणी पट्ट्यातील सर्वात मोठा नेता असलेल्या नारायण राणे यांना पक्षात यांना आणल्याचे मानले जाते. सिंधुदुर्गातल्या कणकवली, वैभववाडीत राणे कुटुंबीयांचा जोर असून मुंबईत राणे यांची व्हाेट बँक नसल्याचे चित्र आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply