Take a fresh look at your lifestyle.

चेकबाबत रिझर्व्ह बॅंकेचे नवे नियम पाहिले का..? नाहीतर बसू शकतो मोठा फटका..

दिल्ली : आर्थिक व्यवहारासाठी तुम्ही जर सतत चेकचा (धनादेश) वापर करीत असाल, तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. बॅंकांच्या चेक वापराबाबत रिझर्व्ह बॅंकेने नवीन नियम लागू केले आहेत. त्यानुसार आता यापुढे 50 हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेचा चेक कोणाला दिल्यास, त्यासाठी तुमचा तपशील द्यावा लागणार आहे. तपशील न दिल्यास बँक तुमचा चेक रिजेक्ट करु शकते.

Advertisement

बँकांनी आता पॉझिटिव्ह पे सिस्टीम (PPS) लागू करण्यास सुरुवात केली आहे. बहुतांश बँका 1 सप्टेंबरपासून त्याची अंमलबजावणी करण्याची शक्यता आहे. ‘आरबीआय’ने ऑगस्ट 2020मध्ये ‘चेक ट्रान्झॅक्शन सिस्टम’ (CTS) साठी ‘पॉझिटिव्ह पे सिस्टीम’ जाहीर केली होती.

Advertisement

पॉझिटिव्ह पे मेकॅनिझम’ अंतर्गत तुम्ही दिलेला चेक तुमचाच आहे का? हे तपासता येणार आहे. त्यात चेक जारी करण्याची तारीख, 6 अंकी चेक क्रमांक, रक्कम, लाभार्थ्यांचे नाव, इत्यादींचा समावेश असणार आहे.

Advertisement

बँक शाखेला भेट देऊन वा इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंगद्वारे त्याची माहिती देता येणार आहे. काही बँका ग्राहकांना एसएमएस, एटीएम किंवा ई-मेलद्वारेही माहिती देण्याची सुविधाही देत ​​आहेत. आरबीआय’ने गेल्या वर्षी यासंदर्भातील मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती.

Advertisement

आपल्या खातेधारकांच्या इच्छेनुसार बँका 50 हजार रुपये वा त्यापेक्षा जास्त रकमेवरील चेकसाठी या सुविधा लागू करु शकतात. परंतु, 5 लाखांपेक्षा जास्त रकमेच्या धनादेशांसाठी बँका ही नियम अनिवार्य करू शकतील. त्यामुळे आपल्या बँकेने पीपीएस लागू केले की नाही? किंवा कधी लागू केली जाईल, हे जाणून घेणे गरजेचे आहे.

Advertisement

‘आरबीआय’ने सर्व बँकांना 1 जानेवारी 2021 पासून ‘पीपीएस’ लागू करण्याचे निर्देश दिले होते. त्यामुळे धनादेश प्रक्रियेत होणाऱ्या फसवणूकीपासून बचाव करता येणार आहे. यासंदर्भात अनेक बँकांनी ग्राहकांना संदेश आणि ई-मेल पाठवून सतर्क केले आहे. कोटक महिंद्रा बँकेने आपल्या ग्राहकांना एक ईमेल पाठवला आहे.

Advertisement

दरम्यान, अॅक्सिस बँकेसह इतर बँकांनी जास्त रकमेवरील चेकसाठी ‘पीपीएस’ अनिवार्य केले आहे. त्यामुळे ग्राहकांना चेक दिल्यानंतर बॅंकेला नेट / मोबाईल बँकिंगद्वारे किंवा शाखेत जाऊन चेक डिटेल्स द्यावे लागतील. ज्यांच्याजवळ या सुविधा नाहीत, त्यांना या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. विशेष म्हणजे, स्टेट बँक ऑफ इंडिया, महिंद्रा कोटक बँकांनी ‘पीपीएस’ला अनिवार्य केल्याचे सांगण्यात येत आहे.

Advertisement

चेकचे व्हेरिफिकेशन कसे करणार?
इंटरनेट बँकिंगद्वारे चेकचे व्हेरिफिकेशन करता येणार आहे. त्यासाठी ग्राहकाला नेट बँकिंगवर लॉगिन करावे लागेल. त्यानंतर सर्व्हिसेसची निवड केल्यानंतर चेक सर्व्हिसेसमध्ये जाऊन पॉझिटिव्ह-पे निवडावे लागेल. ज्या नावाने धनादेश दिला आहे, त्याचा तपशील तुम्हाला टाकावा लागेल. पॉझिटिव्ह पे सिस्टीमद्वारे तुम्ही पेमेंटसाठी मर्यादादेखील सेट करू शकता.

Advertisement

महागाईचा भडका..! महिनाभरात खाद्यतेलाची किंमत पाहा कितीने वाढलीय..?
श्रीगोंद्याच्या नागवडे कारखान्यामध्ये हुकुमशाही; पहा मगर यांनी नेमके काय आरोप केलेत

Advertisement
Advertisement

Leave a Reply