Take a fresh look at your lifestyle.

महागाईचा भडका..! महिनाभरात खाद्यतेलाची किंमत पाहा कितीने वाढलीय..?

मुंबई : मागील काही दिवसांपासून महागाई सर्वोच्च स्तरावर पोचली आहे. पेट्रोल-डिझेलसह गॅस दरवाढीने सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. त्यात आता आणखी खाद्यतेलाची भर पडली आहे. त्यामुळे महागाईने जनतेची होरपळ सुरूच आहे. खाद्यतेलाच्या किमती कमी करण्यासाठी मोदी सरकार प्रयत्न करीत असले, तरी तेलाच्या किमती कमी होताना दिसत नाही.

Advertisement

गेल्या महिनाभराचा विचार केला, तरी खाद्यतेलाच्या किमतीत सरासरी २० टक्के वाढ झाल्याचे दिसते. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत वाढलेल्या किंमतीमुळे देशात खाद्यतेल व डाळींच्या किंमती वाढल्याचे भारतीय उद्योग मंडळाकडून सांगण्यात येते. खाद्यतेल आणि डाळींच्या किमती अशाच वाढत राहिल्यास नजीकच्या काळात महागाईचा भडका उडण्याची भीती महामंडळाने व्यक्त केलीय.

Advertisement

महिनाभरात खाद्यतेल २० टक्के, तर डाळींच्या किमतीत १० टक्क्यांनी वाढ झालीय. एका आकडेवारीनुसार, दिल्लीत रिफाईन्ड ऑईलच्या दरात ५ रुपये, तर इतर तेलांच्या किंमतीत १५ ते २० रुपयांची वाढ झाली आहे. गेल्या वर्षभरात तेलबियांच्या उत्पादनात घट झाली आहे. त्याचा परिणाम खाद्यतेलाच्या उत्पादनावर झाल्याचे दिसते. तेलाची आयात महागल्याने आणि इंधन दरवाढीने वाहतूकखर्च परवडत नसल्याचा परिणाम खाद्यतेलाच्या किमतीत वाढ होण्यात झाला आहे.

Advertisement

केंद्र सरकारने पावसाळी अधिवेशनात खाद्य तेलातील दरवाढीबाबत राज्यसभेत माहिती दिली होती. त्यात सरकारने म्हटले होते, की मागील वर्षभरात सूर्यफुलाच्या किमतीत ४०.६ टक्के वाढ झाली. सोयाबीन तेलाच्या किमतीत ३७ टक्के वाढ झाली. वर्षभरात पामतेल ३५.३ टक्क्यांनी महागल्याचे सरकारने सांगितले होते.

Advertisement

रस्ते-रेल्वे-विमानतळ विकणे कॅन्सल, आता भाड्याने देणार..! मोदी सरकारचा निर्णय, किती निधी मिळणार पाहा..
एलआयसीची भन्नाट योजना, जून्या पाॅलिसीधारकांचा होणार मोठा फायदा, जाणून घेण्यासाठी वाचा..

Advertisement
Advertisement

Leave a Reply