Take a fresh look at your lifestyle.

शिक्षक बँकेच्या संचालकांच्या विक्रमी कामगिरीवर ‘सदिच्छा’ची टीका; ‘त्या’ मुद्द्यावर राजीनामा देण्याची केलीय मागणी

अहमदनगर : कोविड महामारी चालू असून प्रवासावर निर्बंध असताना देखील संचालकांनी गेल्या वर्षीच्या मिटिंग ६६१ वरून उडी मारून अहवाल सलात ७१० मिटिंग घेऊन विक्रम घडवताना प्रवास भत्याचा खर्च २६ लाख ४३ हजार ६२९ रुपयांवरून ३० लाख ९० हजार ६९ रुपयांवर संचालकांनी नेला आहे. हा प्रवास नेमका कोणत्या वाहनाने व कोणत्या मार्गाने केला, याचा हिशेब संचालकांनी देतानाच बँकेच्या तिजोरीवर व सभासदांच्या ठेवींवर आडवा हात मारला असून या संचालक मंडळाला थोडी जरी चाड असेल, तर या संचालकांनी राजीनामा देण्याची मागणी शिक्षक संघ व सदिच्छा मंडळाने केली आहे.

Advertisement

शिक्षक नेते नेते नारायण राऊत यांनी म्हटले आहे की, शिक्षकांची कामधेनू असलेल्या प्राथमिक शिक्षक बँकेचा वार्षिक अहवाल प्रसिद्ध झाला असून गेल्या वर्षी झालेल्या ऑनलाइन वार्षिक सभेचा खर्च तब्बल ३ लाख २८ हजार दाखवण्यात आला. सभा जर ऑनलाइन घेण्यात आली होती, तर हा खर्च नेमका कोणासाठी करण्यात आला यावर संचालकांनी उत्तर देणे आवश्यक आहे. वार्षिक सभेत (२९ ऑगस्ट) या निर्णयांना सदिच्छा मंडळ विरोध करणार असल्याचे राजेंद्र शिंदे, रवींद्र पिंपळे, अनिल आंधळे, नवनाथ तोडमल, बाळासाहेब खिलारी, ज्ञानेश्वर माळवे, विनोद फलके, गहिनीनाथ शिरसाठ, शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष माधव हासे, सदिच्छा मंडळाचे जिल्हाध्यक्ष नारायण राऊत, कार्याध्यक्ष दादा वाघ, बाबा आव्हाड, बाळकृष्ण डमाळ, राजाभाऊ बेहळे, बबन गाडेकर, रहिमान शेख, चंद्रकांत मोरे यांनी म्हटलेले आहे.

Advertisement
शिक्षक संघ व सदिच्छा मंडळाने उपस्थित केलेले मुद्दे असे :
अहवालात अनेक तुघलकी पोटनियम दुरुस्ती संचालक मंडळाच्या वतीने घेण्यात आलेले दिसून येतात
मृत सभासद कर्जनिवारण निधीचे नाव बदलून त्यास सभासद कर्जनिवारण व थकबाकीदार कर्जनिवारण निधी असे नाव देण्याचा घाट
भविष्यात मर्जीतल्या थकबाकीदारांचे कर्ज निवारण केले जाऊन बँक अडचणीत येण्याची शक्यता
निधीमध्ये प्रत्येक एप्रिल महिन्यात १०० रुपयांनी वाढ प्रस्तावित केली. त्याचप्रमाणे सभासदाच्या खात्यावरील मयतनिधीतून सात हजार रुपये कर्जनिवारण निधीत घेतले जाणार असून यामुळे सभासदांना आर्थिक भुर्दंड बसणार
कुटुंब आधार निधी १५० रुपयांऐवजी ५०० रुपये घेण्याचे प्रस्तावित आहे. वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडल्यानंतर तब्बल ८ हजार ५५० रुपये सभासदांवर भार टाकला जाणार
सभासदांच्या पगारात वाढ व्हावी म्हणून कायमनिधी कमी करणारे संचालक मंडळ दुसऱ्या हाताने सभासदांच्या खिशात हात घालत आहे
बँकेचा सीडी रेशो ७६.०९ टक्के आहे. याआधी सीडी रेशो वाढल्यामुळे बँकेस रिझर्व्ह बँकेने दोन कोटींचा दंड ठोठावला होता
सदिच्छा मंडळ सत्तेत आल्यानंतर हा दंड माफ करून आणला होता. हा रेशो असाच वाढत राहिल्यास रिझर्व्ह बँकेचे निर्बंध लागून बँकेचे अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता
सदिच्छा मंडळाने कार्यकाळात सुरू केलेली एटीएम सुविधा कार्यान्वित करण्यास पाच वर्षे लागले
सेव्हिंग खातेदाराच्या मागणीनुसार एटीएम कार्ड देणे आवश्यक असताना, गेल्या तीन वर्षांपासून आर्थिक तरतूद करूनही कार्यवाही नाही
एटीएम कार्डसाठी २०१९-२० साठी ७ लाख १२ हजार रुपये व २०२०-२१ साठी तब्बल १३ लाख ७२ हजारांची खर्च करण्यात आला असून पुढील वर्षासाठी ६ लाखांची तरतूद करण्यात आली. आतापर्यंत एटीएम छपाईवर २६ लाख खर्च करण्याची मानसिकता उघड

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply