Take a fresh look at your lifestyle.

श्रीगोंद्याच्या नागवडे कारखान्यामध्ये हुकुमशाही; पहा मगर यांनी नेमके काय आरोप केलेत

अहमदनगर : श्रीगोंदा येथील शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागल्याने आता या तालुक्यात राजकारणाने पुन्हा एकदा उचल खाल्ली आहे. एकेकाळी नागवडे गटाकडून असलेल्या कारखान्याचे माजी उपाध्यक्ष केशव मगर यांनी पत्रकार परिषदेत अनेक गंभीर आरोप केले आहेत.

Advertisement

मंगळवारी पत्रकार परिषदेत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, पंचायत समिती सदस्य जिजबापू शिंदे, मार्केट कमिटीचे चेअरमन संजय जामदार, माजी उपाध्यक्ष वैभव पाचपुते, काँगेसचे तालुकाध्यक्ष दीपक भोसले, नंदकुमार कोकाटे, ॲड. बापूसाहेब भोस, ॲड. बाळासाहेब काकडे अादी उपस्थित होते. दरम्यान, निवडणूक डोळ्यासोर ठेवून हे आरोप करीत असून या आरोपात काही ही तथ्य नाही. उलट हे आरोप बिनबुडाचे आणि पोरकटपणाचे असल्याची प्रतिक्रिया साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी दिली आहे.

Advertisement
पत्रकार परिषदेत नागवडे गटावर झालेले आरोप असे :
सहकारात शिवाजीराव नागवडे बापू असताना राजेंद्र नागवडे हे फक्त नामधारी होते. मात्र बापू गेल्यानंतर राजेंद्र नागवडे यांनी शेतकऱ्यांची कामधेनू असलेला नागवडे सहकारी साखर कारखान्यात हुकूमशाही सारखा कारभार करत मोठ्या प्रमाणात भ्रष्टचार
उद्या होणाऱ्या कारखाना निवडणूकीत शेतकऱ्यांचे प्रपचं उद्ध्वस्त करणाऱ्या राजेंद्र नागवडे यांना कारखान्यातून हद्दपार करण्याची ही लढाई
चेअरमन राजेंद्र नागवडे यांना कारखाना चालवण्याचे ज्ञान नसून २०१९ ला तालुक्यात मूबलक ऊस असताना देखील नागवडे यांनी विनाकारण कारखाना बंद ठेवला
परभणी व कऱ्हाड येथील खासगी कारखान्यावर कामाकरिता नेऊन त्या कामगारांचे पगार श्रीगोंदे कारखान्याकडून अदा केल्याचा आरोप
कारखान्यावर सुरू असलेले कोजनचे काम वेळेत पूर्ण न झाल्याने शासनाने डीपॉझिट असलेले ८० लाख रुपये जप्त
कोजनचे काम सुरू झाले नसताना देखील त्यासाठी घेतलेले कर्जाचे हप्ते देखील सुरू झाल्याने उत्पन्न ऐवजी मोठे नुकसान
राजेंद्र नागवडे हे सत्तेचे लालची असून सत्ता जिकडे तिकडे नागवडे असे समिकरण असल्याने सहकार वाचवण्यासाठी नागवडे कारखाना वाचवण्यासाठी सभासदांना व सर्व सहकार्यांना बरोबर घेऊन आपण कारखाना निवडणुकीत पॅनल उभारून निवडणूक लढवणार
शेलार म्हणाले, नागवडे यांनी कारखाना चालवताना गलिच्छ पद्धतीने चालवला. अनेक गोष्टींचा भांडाफोड करू नये म्हणून केशव मगर आणि माझे संचालक पद रद्द करण्याचा प्रस्ताव पाठवला
नागवडे यांनी आम्हला कोणी विरोध करणार नाही, असे समजून सभासदांचा कारखाना धुवून खायचा कार्यक्रम चालू केला असल्याने आगामी कारखाना निवडणुकित केशव भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली लढून केशवभाऊ यांनाच पुढील चेअरमन करणार, असे शेलार म्हणाले

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply