Take a fresh look at your lifestyle.

एलआयसीची भन्नाट योजना, जून्या पाॅलिसीधारकांचा होणार मोठा फायदा, जाणून घेण्यासाठी वाचा..

मुंबई : भारती लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन (Bharti Life Insurance Corporation)च्या जून्या पाॅलिसी धारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. काही कारणास्तव वा हप्ता चुकल्याने बंद पडलेली पॉलिसी आता पुन्हा सुरु करता येणार आहे. त्यासाठी एलआयसीने खास नवी संधी उपलब्ध करुन दिली आहे. त्यामुळे बंद पडलेली वा जुनी पॉलिसी पुन्हा सुरु करु शकता. एलआयसी (LIC) पॉलिसीधारकांसाठी 23 ऑगस्ट 2021 ते 22 ऑक्टोबर 2021 पर्यंत ही मोहीम चालणार असल्याचे सांगण्यात आले.

Advertisement

एलआयसी (LIC) पॉलिसी प्रीमियम भरण्याच्या कालावधीदरम्यान बंद केली गेली आहे आणि पॉलिसी टर्म दरम्यानच्या आधीच बंद झाली असेल, तर एलआयसीच्या नवीन योजनेअंतर्गत पुन्हा सुरु होण्यास पात्र आहेत. या मोहिमेचा फायदा त्याच पॉलिसीधारकांना होईल, ज्यांच्या पॉलिसी काही कारणामुळे प्रीमियम न भरल्यामुळे बंद करण्यात झाल्या आहेत.

Advertisement

पॉलिसीधारकांना त्यांच्या शेवटच्या न भरलेल्या प्रीमियमच्या तारखेपासून पाच वर्षांच्या आत काही पॉलिसी पुन्हा सुरु करता येतील. त्यासाठी एलआयसीच्या काही निश्चित अटी आणि शर्ती लागू असल्याचे एलआयसीने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

Advertisement

एलआयसी पॉलिसीधारकांनी भरलेल्या एकूण प्रीमियमवर आधारित मुदत आश्वासन आणि उच्च जोखमीच्या योजनांव्यतिरिक्त इतर पॉलिसींच्या विलंब शुल्कात काही सवलत देण्यात येणार आहे.

Advertisement

एलआयसी पाॅलिसीच्या 1 लाख रुपयांपर्यंतच्या थकबाकीच्या प्रीमियमवर, पॉलिसीधारकाला विलंब शुल्कात 20 टक्क्यांपर्यंत सवलत मिळेल, ज्याची कमाल मर्यादा 2,000 रुपये आहे. पॉलिसीधारकाला 1,00,001 ते 3 लाख रुपयांपर्यंत थकीत प्रीमियमवर 25 टक्के विलंबशुल्क सवलत मिळेल, कमाल मर्यादा 2,500 रुपयांपर्यंत आहे.

Advertisement

3 लाख रुपयांपेक्षा अधिक प्रीमियममुळे एलआयसीसाठी 30 टक्के सूट विलंब शुल्कासाठी उपलब्ध असेल, कमाल मर्यादा 3,000 रुपये आहे. एलआयसीने सांगितले, की वैद्यकीय आवश्यकतांमध्ये कोणतीही शिथिलता येणार नाही. पात्र आरोग्य आणि सूक्ष्म विमा पॉलिसींमध्ये विलंब शुल्क माफीदेखील उपलब्ध असेल, असे म्हटले आहे.

Advertisement

आणि तशा पद्धतीने क्लिप झाली व्हायरल; पहा लंकेंना लक्ष्य करून काय म्हटलेय आता तहसीलदारांनी
आता रंगणार राणेपुराण..! पहा नेमका काय घोळ चाललाय राज्यात, मूळ प्रश्न पडले कोड्यात..!

Advertisement
Advertisement

Leave a Reply