Take a fresh look at your lifestyle.

आता रंगणार राणेपुराण..! पहा नेमका काय घोळ चाललाय राज्यात, मूळ प्रश्न पडले कोड्यात..!

मुंबई : महाराष्ट्र राज्यात आरोग्य आणि शेतीचे प्रश्न जोमात असताना त्यावर फोकस करायला कोणत्याही राजकीय पक्षाकडे वेळ नाही. यावरून लक्ष दूर करण्यासाठी म्हणून सगळेच राजकीय पक्ष जनतेची दिशाभूल करण्यात मश्गुल आहेत. त्यात आता भर पडली आहे राणेपुराणाची..!

Advertisement

होय, केंद्र सरकारकडून अपेक्षित प्रमाणात करोना लस पुरवठा होत नाही. त्याचवेळी सरकारी आरोग्य व्यवस्थेची दुरवस्था झाली आहे. कांद्यासह सर्वच शेतमालाचे भाव पडले आहेत. राज्यात कुठेही हमीभाव मिळत नसल्याचे चित्र आहे. तर, केंद्र सरकारच्या कृपेने सोयाबीनचे भाव पडले आहेत. त्यावर कोणतेही राजकीय पक्ष चकार शब्द बोलत नसतात वैयक्तिक कुरघोडीचे राजकारण जोमात आहे. राज्यातील सत्ताधारी शिवसेना आणि केंद्रातील सत्ताधीश भाजप यांच्यातील कलगीतुरा जोमात आहे. तर, कॉंग्रेस-राष्ट्रवादी नावाच्या पक्षांनी बघ्याची भूमिका घेऊन मूग गिळले आहेत.

Advertisement

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर पातळी सोडून टीका केल्याचे प्रकरण आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना भोवण्याची शक्यता असून त्याचीच चर्चा सध्या सुरू आहे. शिवसेना नेते सुधाकर बडगुजर यांनी नाशिक पोलिसांकडे यासंदर्भात तक्रार केल्यावर लिसांकडून गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांना अटक करण्यात येणार आहे. नारायण राणे सध्या परशुराम घाटातील ग्रीन रिसॉर्टमध्ये थांबले असून नाशिक पोलिसांचे पथक येथूनच त्यांना ताब्यात घेणार असल्याचे समजते. दरम्यान, यामुळे राणे समर्थक आणि भाजप खवळला आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement

Leave a Reply