Take a fresh look at your lifestyle.

आणि पाकिस्तानने मारली पलटी; पहा अफगाणिस्तानच्या मुद्द्यावर काय म्हटलेय परराष्ट्र मंत्र्यांनी

दिल्ली : अशरफ घनी यांच्या राजवटीत पाकिस्तानचा असलेला सूर आता तालिबानी राजवटीत बदलला आहे. त्यावेळी जे भारताशी अफगाणिस्तानच्या मजबूत संबंधांना कडाडून विरोध करत होते तेच पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी युटर्न घेतला आहे. ते म्हणाले की, भारताला उथळ विचार सोडून द्यावा लागेल. भारताच्या अफगाणिस्तानशी असलेल्या चांगल्या संबंधांना आमचा विरोध नाही. तालिबानला मदत करण्यासाठी हजारो जिहादी पाठवणाऱ्या कुरेशी यांनी दावा केला की पाकिस्तान अफगाणिस्तानमधील कोणत्याही विशिष्ट गटावर लक्ष केंद्रित करत नाही.

Advertisement

शाह मेहमूद कुरेशी म्हणाले की, पाकिस्तान आपल्या शेजारच्या देशात अधिक शांतता आणि स्थिरता आणण्यासाठी सर्वसमावेशक, व्यापक दृष्टिकोनावर आधारित सरकार बनवण्यास मदत करत आहे. कुरेशी यांचे हे वक्तव्य अशा वेळी आले आहे जेव्हा असे म्हटले जात आहे की पाकिस्तानी सैन्य क्वेटा शहरात उपस्थित असलेल्या तालिबान नेत्यांच्या सहकार्याने अफगाणिस्तानमधील मंत्र्यांची यादी तयार करत आहे. कुरेशी म्हणाले की, अफगाणिस्तानमधील घडामोडीवर आंतरराष्ट्रीय समुदाय विचारतो की पाकिस्तानचे मत काय आहे? आज जग अफगाणिस्तानसंदर्भात पाकिस्तानकडे पाहत आहे आणि तेथून तेथील नागरिकांना बाहेर काढण्यासाठी मदत मागत आहे. भारतासोबतच्या अफगाणिस्तानच्या संबंधांना आमचा विरोध नाही.

Advertisement

अफगाणिस्तानातून लोकांना बाहेर काढण्यासाठी आपला देश इतकी मदत करत आहे, असाच दावा कुरेशी यांनी केला आहे. त्यांनी दावा केला की, काबूलमधील पाकिस्तानी दूतावास सतत काम करत आहे आणि लोकांना तेथून बाहेर काढले जात आहे. तरीही पाकिस्तानला मदत करणारा ओळखले जात आहे का? तर, नाही. आमचा साधा उल्लेखही केला जात नाही. एकूणच पाकिस्तान या मुद्द्यावर वेगवेगळ्या चाली खेळून आपण शहाजोगपणे काम करीत असल्याचे जगाला सांगण्याचा प्रयत्न करीत आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply