Take a fresh look at your lifestyle.

पैशांअभावी नाही थांबणार परदेशातील शिक्षण, एसबीआयने आणलीय विशेष स्किम.. कसा घेणार लाभ, वाचा..

नवी दिल्ली : सध्या शिक्षण घेणे आवाक्याबाहेर गेले आहे. अनेक बॅंका विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी कर्ज देतात. नोकरी मिळाल्यावर विद्यार्थ्यांनी हे कर्ज फेडता येते. परदेशात शिक्षण घेण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतातील सर्वात मोठी बॅंक असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)ने परदेशात शिक्षण घेण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांसाठी नवीन शैक्षणिक कर्ज योजना सुरू केलीय.

Advertisement

एसबीआय ग्लोबल ईद-व्हॅन्टेज (SBI Global Ed-Vantage) असे या योजनेचे नाव आहे. परदेशात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना या योजनेत कर्ज दिले जाणार आहे. त्यामुळे भारतातील विद्यार्थी परदेशी महाविद्यालये-विद्यापीठांमध्ये प्रवेश घेऊ शकतील.

Advertisement

या अभ्यासक्रमासाठी मिळणार कर्ज
– नियमित पदवी
– पदव्युत्तर पदवी
– डिप्लोमा

Advertisement

परदेशातील कोणत्याही महाविद्यालयात वा विद्यापीठात या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात. अमेरिका, यूके, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, युरोप, जपान, सिंगापूर, हाँगकाँग आणि न्यूझीलंडमध्ये या कर्जयोजनेचा लाभ विद्यार्थ्यांना दिला जाणार आहे.

Advertisement

किती कर्ज मिळेल?
SBI global Ed-vantage अंतर्गत कोणत्याही विद्यार्थ्यास किमान 7.50 लाख ते जास्तीत जास्त 1.50 कोटी रुपयांपर्यंत कर्ज दिले जाणार आहे.

Advertisement

व्याजदर काय असेल?
विद्यार्थ्यांना अभ्यास करताना कर्जाचा अतिरिक्त दबाव येऊ नये, यासाठी SBI global Ed-vantage कर्जाचा व्याजदर माफक ठेवण्यात आलाय.  या योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना 8.65% दराने कर्ज दिले जाणार आहे. मुलींना विद्यार्थ्यांच्या तुलनेत एसबीआयने 0.50 टक्के सवलत दिलीय, म्हणजेच मुलींना 8.15 टक्के दरानेच कर्ज दिले जाणार आहे.

Advertisement

विशेष परतफेड सुविधा
अभ्यासक्रम पूर्ण झाल्याच्या 6 महिन्यांनी विद्यार्थ्यांना कर्जपरतफेड करता येणार आहे. परदेशातील कोणतेही महाविद्यालय वा विद्यापीठात शिकणारा भारतीय विद्यार्थी कर्जाची रक्कम कर्जाच्या तारखेपासून जास्तीत जास्त 15 वर्षांच्या आत परत करू शकतो.

Advertisement

कर्जात या खर्चाचा समावेश
– प्रवास खर्च वा पास शुल्क
– शिक्षण शुल्क
– परीक्षा, ग्रंथालय आणि प्रयोगशाळेचा खर्च.
– पुस्तके, अभ्यास उपकरणे, साधने, गणवेश आणि संगणक शुल्क
– प्रकल्पाच्या कामाप्रमाणे प्रबंध, अभ्यास दौरा करता येईल. मात्र शिक्षण शुल्काच्या 20% पेक्षा जास्त त्याचा खर्च नसावा.

Advertisement

कर्जासाठी कोण पात्र?
– 10 वी, 12 वी आणि पदवीची मार्कशीट, प्रवेशपरीक्षेचा निकाल द्यावा लागणार
– प्रवेशपत्र किंवा ऑफर लेटर वा प्रवेशपत्रासाठी विद्यापीठ ओळखपत्र
– कोर्ससाठी प्रवेश वेळापत्रकाच्या खर्चाची संपूर्ण माहिती
– शिष्यवृत्ती, विनामूल्य शीपच्या ऑफरची प्रत
– विद्यार्थ्याने मध्येच अभ्यास सोडला असेल, तर त्याचे गॅप प्रमाणपत्र
– विद्यार्थी, पालक, सहकर्जदार, हमीदारांचा प्रत्येकी एक पासपोर्ट फोटो
– सहकर्जदार किंवा जामीनदाराचे मालमत्ता दायित्व विवरण (कर्ज 7.5 लाखांपेक्षा जास्त असल्यास)
– पगारदारांना नवीन वेतन स्लिप, फॉर्म 16 किंवा अलीकडील आयटी रिटर्न सादर करणे आवश्यक
– पगार नसलेल्या लोकांना व्यवसायाचा पत्ता पुरावा आणि अलीकडील आयटी परतावा द्यावा लागेल.

Advertisement

– विद्यार्थ्याचे पालक किंवा हमीदारांचे 6 महिन्यांचे बँकखाते विवरण
– मालमत्तेचा कागद सुरक्षा म्हणून देत असाल, तर विक्रीपत्राची प्रत आणि मालमत्तेचे शीर्षक द्यावे लागेल.
– विद्यार्थी, पालक, सहकर्जदार, हमीदार यांचे पॅन
– आधारची प्रत, जेव्हा विद्यार्थी भारत सरकारच्या विविध योजनांमध्ये सबसिडी घेतो तेव्हा हे अनिवार्य आहे.

Advertisement

अधिकृतपणे वैध दस्तऐवज ओळखीच्या पुराव्यासाठी सादर करावा लागेल. त्यात पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदार ओळखपत्र देऊ शकता. सुरक्षा म्हणून विद्यार्थ्याला संपार्श्विक सुरक्षेचा पेपर सादर करावा लागेल. तृतीय पक्षाकडून संपार्श्विक सुरक्षा दिली जात असेल, तर ते देखील कार्य करेल.

Advertisement

‘विठूमाऊली’च्या मंदिरासाठी ६१ कोटी ५० लाखांचा आराखडा; पहा नेमके कसे रुपडे बदलणार परिसराचे
आता रंगणार राणेपुराण..! पहा नेमका काय घोळ चाललाय राज्यात, मूळ प्रश्न पडले कोड्यात..!

Advertisement
Advertisement

Leave a Reply