Take a fresh look at your lifestyle.

‘विठूमाऊली’च्या मंदिरासाठी ६१ कोटी ५० लाखांचा आराखडा; पहा नेमके कसे रुपडे बदलणार परिसराचे

सोलापूर : पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराला ७०० वर्षांपूर्वीचे मूळ रूप देण्यासाठीचा आराखडा तयार झाला आहे. त्यासाठी पुरातत्त्व विभागाच्या मदतीने केलेल्या आराखड्यानुसार मूळ रूप देण्यासाठी ६१ कोटी ५० लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. अंतिम मंजुरीसाठी हा आराखडा शासनाच्या विधी‌ व न्याय विभागाकडे या आठवड्यात पाठविला जाणार असल्याची माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर व कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिलेली आहे.

Advertisement

विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे अकराव्या शतकातील असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे. मंदिराला सातशे वर्षांपूर्वीचे मूळ रूप देण्यासाठी पुरातत्व विभागाने दोन वर्षे अभ्यास करून हा आराखडा तयार केला आहे. सातशे वर्षांपूर्वीचे विठ्ठल मंदिर कसे असेल, याची सगळ्यांनाच आता उत्सुकता लागली असून त्याचे काम तातडीने सुरू करून पूर्ण करण्यासाठी वारकरी संप्रदाय राज्य सरकारकडे डोळे लावून बसला आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निधीची मागणी केल्यावर त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत मंदिर विकास आराखड्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी मदत करेल, असे आश्वासन दिले होते. पुढील पाच वर्षात ही सर्व कामे होणार आहेत.

Advertisement
मंदिर आणि परिसरात होणारे बदल :
श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिराला मूळ हेमाडपंथी रूप देण्यासाठी दगडांची झीज झालेल्या ठिकाणी रासायनिक लेपन करून दगडांचे संवर्धन
मंदिराचे आयुष्य वाढविण्यासाठी दुसऱ्या टप्प्यात मजबुतीकरणाचे काम
विठ्ठल मूर्तीला हानीकारक असलेले गाभाऱ्यात बसविलेले ग्रॅनाईट हटवून त्यामागील दगडी बांधकाम मूळ स्वरूपात करणे
तिसऱ्या टप्प्यात नव्या पद्धतीने बांधलेले नामदेव महाद्वाराचे आरसीसी बांधकाम पाडून तेथे मूळ मंदिराला शोभेल अशा पुरातन दगडात महाद्वार बनवणे
मंदिरावरून जाणारी दर्शन रांग काढून शेजारी एक स्कायवॉक ‌तयार करणे
शेवटच्या टप्प्यात सुरक्षेच्या दृष्टीने अग्निशमन यंत्रणा, विद्युतीकरण आणि वातानुकूलित यंत्रणा यांचे आधुनिकीकरण करणे

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply