Take a fresh look at your lifestyle.

राणेंच्या मुद्द्यावर जयंत पाटलांनी म्हटलेय ‘असे’; पहा काय टीका केलीय त्यांनी

पुणे :  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेले वक्तव्य चुकीचे असून याला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे समर्थन आहे का, असा प्रश्न राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी केला आहे.

Advertisement

त्यांनी म्हटले आहे की, राज्याच्या मुख्यमंत्र्यांबद्दल ही भाषा वापरणे चुकीची आहे. राजकारणाचा स्तर खाली गेलाय असे नाही तर काही लोकांचा स्तर खाली गेलाय. इतक्या खालच्या थराला जाऊन मुख्यमंत्र्यांबद्दल असे वक्तव्य करणे याचा निषेध करावा तेवढा कमी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप चे समर्थन करतात का याचा खुलासा होणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर भाजपाचा वैयक्तिक राग असेल, पण त्यांच्याबद्दल अशा प्रकारची भाषा वापरणे महाराष्ट्र कधीच मान्य करणार नाही.

Advertisement

त्यांनी पुढे म्हटलेय की, मा. मुख्यमंत्र्यांबद्दल केंद्रीय मंत्री राणे यांनी केलेले वक्तव्य निषेधार्ह आहे. हा महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान आहे. मोदींनी आपल्या मंत्रिमंडळात कसे सहकारी निवडले आहेत याची छोटीशी चुणूक या वक्तव्यावरुन देशाला व महाराष्ट्राला मिळालेली आहे. दरम्यान, राणे अशोभनीय भाषेचा वापर करत आहेत. हा केवळ मुख्यमंत्र्यांचा नाही तर महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान आहे. हा अपमान कदापि सहन होऊ शकत नाही, अशी प्रतिक्रिया अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी म्हटले आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement

Leave a Reply