Take a fresh look at your lifestyle.

भारताने दिला अमेरिकेलाही झटका; पहा कोणत्या क्षेत्रात जगभरात घेतली दणक्यात आघाडी

मुंबई : भारताने अमेरिकेला मागे टाकत जगातील दुसरे सर्वात आकर्षक उत्पादन केंद्र बनण्यात यश मिळवले आहे. रिअल इस्टेट सल्लागार कुशमन आणि वेकफील्ड यांनी ही माहिती दिली आहे. मॅन्युफॅक्चरिंग हब म्हणून भारताचे आकर्षण जगभरात आहे. कारण खर्चाच्या आघाडीवर भारताची कार्यक्षमता अनेक कंपन्यांना खुणावत आहे. कुशमन अँड वेकफील्डने एका निवेदनात म्हटले आहे की, ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग रिस्क इंडेक्स 2021 मध्ये चीन प्रथम क्रमांकावर आहे.

Advertisement

युरोप, अमेरिका आणि आशिया-पॅसिफिक (APAC) यामधील 47 देशांपैकी जागतिक उत्पादनासाठी आकर्षक किंवा फायदेशीर ठिकाणे या निर्देशांकाचे मोजमाप करतात. निवेदनात म्हटले आहे की, सर्वाधिक मागणी असलेल्या उत्पादन स्थळांमध्ये चीननंतर भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत अमेरिकेचा तिसरा, कॅनडाचा चौथा, झेक प्रजासत्ताकाचा पाचवा, इंडोनेशियाचा सहावा, लिथुआनियाचा सातवा, थायलंडचा आठवा, मलेशियाचा नववा आणि पोलंडचा दहावा क्रमांक आहे.

Advertisement

गेल्या वर्षीच्या अहवालात अमेरिका दुसऱ्या आणि भारत तिसऱ्या क्रमांकावर होता. हे दर्शवते की अमेरिका आणि आशिया-पॅसिफिक क्षेत्राच्या तुलनेत उत्पादक भारतात रस दाखवत आहेत, असे निवेदनात म्हटले आहे. परिचालन परिस्थिती आणि खर्च कार्यक्षमतेमुळे उत्पादन स्थळ म्हणून भारताचे आकर्षण वाढले आहे, असे निवेदनात म्हटले आहे. याव्यतिरिक्त, भारताने आउटसोर्सिंग आवश्यकता यशस्वीरित्या पूर्ण केल्या आहेत. यामुळे वार्षिक आधारावर भारताची क्रमवारी सुधारली आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply