Take a fresh look at your lifestyle.

सोन्याच्या दरात उसळी, चांदीनेही खाल्ला भाव, सराफा बाजारात अशी राहिली स्थिती..

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात चढउतार सुरू आहेत. न्यूयॉर्कस्थित कमोडिटी एक्सचेंजवर स्पॉट गोल्डची किंमत किरकोळ प्रमाणात उतरली. डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य 9 पैशांनी वधारले. आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम मंगळवारी (ता. 24) सकाळी ‘मल्टी कमोडिटी एक्सचेंज’वर (MCX) पाहायला मिळाला. सकाळच्या सत्रात सोन्या-चांदीच्या भावात काहीसी घसरण झाली होती. मात्र, त्यानंतर साेन्यासह चांदीच्या भावात मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले.

Advertisement

भारतीय सराफा बाजारात आज सोन्या-चांदीचे दर वधारले. सोने 46 हजार रुपये प्रति तोळापेक्षा अधिक होते. चांदीच्या दरही वधारले. आधीच्या व्यवहाराच्या सत्रात दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचे दर 46,374 रुपये प्रति तोळा होते. चांदीचे दर 61,412 रुपये प्रति किलो होते.

Advertisement

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर कमी झाले आहेत, तर चांदीच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. दिल्लीतील सराफा बाजारात आज (मंगळवारी) सोन्याच्या दरात 170 रुपयांची वाढ पाहायला मिळाली. नंतर सोन्याचे दर 46 हजारांपेक्षा जास्त आहेत.

Advertisement

दिल्लीत 99.9 ग्रॅम शुद्धतेच्या सोन्याचे दर 46,544 रुपये प्रति तोळा आहेत. भारतीय सराफा बाजाराच्या विरोधातील परिस्थिती आंतरराष्ट्रीय बाजारात आहे. याठिकाणी सोन्याचे दर कमी झाले आहेत. या घसरणीनंतर दर 1,801 डॉलर प्रति औंसवर पोहोचले आहेत.

Advertisement

चांदीच्या किंमतीतही वाढ पाहायला मिळाली. मंगळवारी दिल्लीतील सराफा बाजारात चांदीचे दर 172 रुपयांनी वधारले आहेत. यानंतर चांदीचे दर 61,584 रुपये प्रति किलोवर आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीच्या दरात विशेष बदल झालेला नाही. चांदीचे दर 23.60 डॉलर प्रति औंसवर होते.

Advertisement

राज्यात सॅम-मॅम बालकांसाठी धडक शोधमोहीम; पहा नेमके काय नियोजन आहे बाल विकासचे
रस्ते-रेल्वे-विमानतळ विकणे कॅन्सल, आता भाड्याने देणार..! मोदी सरकारचा निर्णय, किती निधी मिळणार पाहा..

Advertisement
Advertisement

Leave a Reply