Take a fresh look at your lifestyle.

भांडवली बाजारात तेजी कायम, नफावसुलीने आयटी क्षेत्रातील शेअरमध्ये घसरण..

मुंबई :  गुंतवणूकदारांनी खरेदीचा ओघ कायम ठेवल्याने भांडवली बाजारात तेजी कायम आहे. त्याचा परिणाम आज (मंगळवारी) बाजारात पाहायला मिळाला. सकाळच्या सत्रातच सेन्सेक्स आणि निफ्टीने उसळी घेतली. सेन्सेक्स १२९ अंकांनी वधारुन ५५६८५ अंकावर आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ४० अंकांनी वधारुन १६५३७ अंकावर पोचला. आयटी शेअर, मेटल , ऑटो, बँका, वित्त संस्थाच्या शेअरमध्ये आजच्या सत्रात वाढ झाल्याचे दिसून आले.

Advertisement

आशियातील प्रमुख भांडवली बाजारातही आज तेजीचे वातावरण पाहायला मिळाले. काल (सोमवारी) अमेरिकेतील भांडवली बाजारात वाढ झाली होती. त्याचे पडसाद आज आशियात उमटले. टोकियो, हाँगकाँग, जपानमध्ये शेअर बाजारात तेजी पाहायला मिळाली.

Advertisement

भारतात सेन्सेक्स मंचावर ३० पैकी २१ शेअर तेजीत, तर ९ शेअरमध्ये घसरण झाली. टाटा स्टील, एनटीपीसी, टेक महिंद्रा, पॉवरग्रीड, इंडसइंड बँक, एल अँड टी, बजाज ऑटो, अल्ट्राटेक सिमेंट, डॉ. रेड्डी लॅब, टीसीएस, इन्फोसिस, एचडीएफसी बँक, टायटन, रिलायन्स इंडस्ट्रीज या शेअरच्या किमतीत वाढ झाली. बजाज फायनान्स, आयसीआयसीआय बँक, एचयूएल, नेस्ले, एचडीएफसी, मारुती, एशियन पेंट या शेअरमध्ये घसरण दिसून आली.

Advertisement

माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात नफावसुली झाल्याने एम्फसिस, माइंड ट्री, एल अँड टेकनॉलॉजी, टाटा एलेस्की या शेअरमध्ये घसरण झाली. इन्फोसिसचे बाजार भांडवल आज १०० अब्ज डॉलर्सवर गेले. असा टप्पा ओलांडाणारी इन्फोसिस देशातील चौथी कंपनी ठरली आहे.

Advertisement

डॉलरच्या तुलनेत चलन बाजारात सोमवारी रुपया १७ पैशांनी वधारला होता. तो ७४.२२ वर बंद झाला. आजदेखील रुपयाचे मूल्य वधारले. डॉलरच्या तुलनेत रुपया ९ पैशांनी वधारला. सोमवारच्या सत्रात सेन्सेक्समध्ये २२६ अंकांची वाढ झाली होती. तो ५५५५५ अंकावर स्थिरावला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ४५.९५ अंकांनी वधारला आणि तो १६४९६ अंकावर बंद झाला.

Advertisement

सोन्याच्या दरात उसळी, चांदीनेही खाल्ला भाव, सराफा बाजारात अशी राहिली स्थिती..
एलआयसीची भन्नाट योजना, जून्या पाॅलिसीधारकांचा होणार मोठा फायदा, जाणून घेण्यासाठी वाचा..

Advertisement
Advertisement

Leave a Reply