Take a fresh look at your lifestyle.

बँकेच्या संचालकांचा प्रवास नेमका कोणत्या मार्गाने..? ‘सदिच्छा’ने उपस्थित केलाय ३१ लाखांच्या खर्चाचा मुद्दा

अहमदनगर : राज्यातील एक सक्षम शिक्षक सहकारी बँक असलेल्या अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या सर्वसाधारण बैठकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. सत्ताधारी मंडळाला आव्हान देऊन आगामी निवडणुकीत लक्ष्य करण्याच्या निमित्ताने आता सदिच्छा मंडळाचे नेते राजू शिंदे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. प्रवास भत्त्याचा खर्च २६ लाख ४३ हजार ६२९ रुपयांवरून ३० लाख ९० हजारांवर गेल्याचा मुद्दा मांडून त्यांनी संचालकांच्या प्रवासावर प्रश्न उपस्थित केला आहे.

Advertisement

सदिच्छा मंडळाचे नेते राजेंद्र शिंदे, रवींद्र पिंपळे, अनिल आंधळे, नवनाथ तोडमल, बाळासाहेब खिलारी, ज्ञानेश्वर माळवे, विनोद फलके, गहिनीनाथ शिरसाठ, शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष माधव हासे, जिल्हाध्यक्ष नारायण राऊत यांनीही काही निर्णयामुळे भासदांना आर्थिक भुर्दंड असल्याकडे लक्ष वेधले आहे. बँकेच्या २९ ऑगस्टला होणाऱ्या सभेत तुघलकी पोटनियम दुरुस्तीचे विषय संचालक मंडळाने घेतल्याचा आरोप होत आहे. पगारवाढ व्हावी म्हणून कायमनिधी कमी करणारे संचालक मंडळ, आता दुसऱ्या हाताने सभासदांच्या खिशात हात घालत आहे. हा दुटप्पीपणा उघड झाला असल्याचा आरोपही शिंदे यांनी केला आहे.

Advertisement

प्राथमिक शिक्षक बँकेचा वार्षिक अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्याचे मुद्दे हेरले आहेत. त्यानुसार रविवारच्या बैठकीत या मुद्द्यांकडे लक्ष वेधले जाणार आहे. करोना कालावधीत संचालकांनी ६६१ बैठका घेतल्यावर आता ही संख्या थेट ७१० वर पोहोचली आहे. त्यासाठी प्रवासभत्ता म्हणून ३० लाख ९० हजार रुपयांचा खर्च झालेला आहे. प्रवास नेमका कोणत्या वाहनाने व कोणत्या मार्गाने केला आहे, याचा हिशेब संचालकांनी पारदर्शीपणे सभासदांना देण्याची मागणी सदिच्छा मंडळाने केली आहे.

Advertisement
सदिच्छा मंडळाने मांडलेले महत्वाचे मुद्दे असे :
मयत सभासद कर्जनिवारण निधीचे नाव बदलून त्यास सभासद कर्जनिवारण व थकबाकीदार कर्जनिवारण निधी असे नाव देण्याचा घाट सत्ताधाऱ्यांचा आहे
भविष्यात मर्जीतल्या थकबाकीदारांचे कर्ज निवारण केले, तर बँक अडचणीत येण्याची शक्यता
सभासदाच्या खात्यावरील मयतनिधीतून सात हजार रूपये कर्जनिवारण निधीत घेतले जाणार आहेत, हा सभासदांना आर्थिक भुर्दंड
कुटुंब आधार निधी १५० ऐवजी आता ५०० रुपये घेण्याचे प्रस्तावित आहे, त्यामुळे सभेत सर्व विषय मंजूर झाले, तर सभासदांवर प्रत्येकी साडेआठ हजारांचा बोजा पडणार

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply