Take a fresh look at your lifestyle.

आला की परवडणारा अन भन्नाट फिचरचा स्मार्टफोन; ऑफरही जोरात, पहा 17,990 मध्ये काय मिळणार ते

मुंबई : Vivo या मोबाईल कंपनी ने सोमवारी भारतात आपला नवीन बजेट स्मार्टफोन Vivo Y33s लाँच केला आहे. या विवो फोनच्या मुख्य वैशिष्ट्यांमध्ये ऑक्टा-कोर मीडिया टेक हेलियो SoC प्रोसेसर आणि ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. हा फोन दोन रंग आणि एका वेरिएंटमध्ये उपलब्ध आहे.

Advertisement

Vivo Y33s ची किंमत भारतीय बाजारपेठेत 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज मॉडेलसाठी 17,990 रुपये आहे. फोन विवो इंडिया ई-स्टोअर, Amazon (अमेझॉन), फ्लिपकार्ट, पेटीएम, टाटा क्लिक, बजाज फिनसर्व ईएमआय स्टोअर आणि सर्व पार्टनर रिटेल स्टोअर्सद्वारे खरेदी केला जाऊ शकतो. एचडीएफसी HDFC आणि आयसीआयसीआय ICICI बँकेच्या क्रेडिट (Credit Card) आणि डेबिट कार्डने केलेल्या खरेदीवर कंपनी 1,500 रुपयांचा फ्लॅट कॅशबॅक आहे. (खरेदीसाठी लिंक https://amzn.to/3y4BaTP)

Advertisement

Advertisement

Vivo Y33s च्या कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाले तर त्यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. यात f/1.8 लेन्ससह 50-मेगापिक्सलचा प्राथमिक सेन्सर, f/2.4 अपर्चरसह 2-मेगापिक्सलचा मॅक्रो शूटर आणि f/2.4 लेन्ससह 2-मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर समाविष्ट आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉल्ससाठी, फोनच्या समोर f/2.0 अपर्चरसह 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

Advertisement

हा एक ड्युअल सिम (नॅनो) फोन आहे, ज्यामध्ये Funtouch OS 11.1 Android 11 ऑपरेटिंग सिस्टमवर आहे. यात 6.58 इंचाचा फुल एचडी प्लस एलसीडी डिस्प्ले 1,080 × 2,408 पिक्सेल आहे. स्मार्टफोनमध्ये MediaTek Helio G80 SoC प्रोसेसर आहे. यात 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज आहे, जे मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने 1TB पर्यंत वाढवता येते.

Advertisement

कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये ड्युअल बँड वायफाय, 4 जी, ब्लूटूथ व्ही 5, एनएफसी, जीपीएस आणि यूएसबी टाइप सी पोर्ट आहे. फिंगरप्रिंट स्कॅनरसह फेस अनलॉकचे वैशिष्ट्य देखील फोनच्या बाजूला देण्यात आले आहे. फोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी आहे, जी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. फोन 164.26 × 76.08 × 8 मिमी आणि वजन 182 ग्रॅम वजन आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement

Leave a Reply