Take a fresh look at your lifestyle.

पाऊस जाणार दीर्घ सुटीवर, परत कधी आगमन होणार, पाहा हवामान विभाग काय म्हणतोय..?

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांत झालेल्या पावसाच्या हलक्या सरींमुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. काही ठिकाणी अजूनही दमदार पाऊस झालेला नाही. मात्र, हलक्या सरींमुळे खरीप पिकांना संजीवनी मिळाली आहे. आता मात्र पावसाने पुन्हा एकदा विश्रांती घेतली आहे. शेतकऱ्यांची चिंता वाढविणारी बातमी असून, आता पाऊस परत दीर्घ सुटीवर जाणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

Advertisement

राज्यातून पुढील 10 दिवस माॅन्सून गायब असेल, असे सांगण्यात येत आहे. गेल्या आठवड्यात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या. त्यानंतर आता पुन्हा राज्यातून पाऊस गायब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सप्टेंबर महिन्याच्या  पहिल्या आठवड्यात माॅन्सूनचं कमबॅक होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

Advertisement

राज्यात ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला सर्वत्र पावसानं उघडीप घेतली होती. त्यानंतर महिनाअखेर तरी चांगला पाऊस होईल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती; पण शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच आली. मात्र, सप्टेंबरच्या सुरुवातीला माॅन्सूनचे पुन्हा एकदा दणक्यात आगमन होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

Advertisement

‘आठवडाभर सरी कोसळल्यानंतर राज्यातून पुन्हा माॅन्सून गायब होण्याची शक्यता आहे. या काळात काही ठिकाणी पावसाची हजेरी लागेल, पण त्याचे प्रमाण अत्यल्प असेल. काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होऊ शकेल.

Advertisement

ऑगस्ट महिन्यात पावसाचं प्रमाण कमी असण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र, ऑगस्ट व सप्टेंबरमधील पावसाचा एकत्रित विचार केल्यास राज्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता असल्याचे भारतीय हवामान खात्याचे वरिष्ठ शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले.

Advertisement

राज्यात पुढील 10 दिवस अशीच स्थिती राहणार असल्याचंही होसाळीकर यांनी सांगितलं आहे. या आधीच मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने, पुढील चार ते पाच दिवस राज्यात कोणताही इशारा दिला नाही. पुढील पाच दिवस राज्यात पावसाची उघडीप असण्याची शक्यता मुंबई वेधशाळेकडून वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे चांगल्या पावसासाठी शेतकऱ्यांना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Advertisement

संजय राठोड यांना क्लिन चिट, महिलेच्या आरोपांबाबत नवा ट्विस्ट, पोलिस तपासात भलतंच आलं समोर..
नोकरी गेलेल्या कर्मचाऱ्यांना दिलासा, मोदी सरकार भरणार या वर्षापर्यंत पीएफ रक्कम..

Advertisement
Advertisement

Leave a Reply