Take a fresh look at your lifestyle.

‘त्या’ भागात आहे मुसळधारची शक्यता; वाचा पंजाब डख यांच्या हवामान अंदाजातील मुद्दे

पुणे : केंद्र सरकारच्या हवामान विभागासह स्कायमेट या खासगी संस्थेकडूनही हवामान अंदाज जाहीर केला जातो. तसेच काही धार्मिक संस्था आणि छोट्या-मोठ्या कृषी संशोधन संस्थाही असा अंदाज जाहीर करतात. सध्या महाराष्ट्र राज्यात हवामान अभ्यासक पंजाब डख (Panjab Dakh Weather Report)  यांच्या हवामान अंदाजाकडे अनेक शेतकरी डोळे लावून बसलेले असतात. अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्या हवामान अंदाजाचे मुद्दे प्रसिद्ध करण्यासाठी सूचना केल्याने आजपासून त्यांनी व्यक्त केलेल्या हवामान अंदाजातील काही महत्वाचे मुद्दे आम्ही प्रसिद्ध करीत आहोत.

Advertisement
पंजाब डख यांच्या हवामान अंदाजातील मुद्दे
29 ऑगस्ट ते ३ सप्टेंबर या तारखेत राज्यात काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज
24 तारखेपासून सूर्यदर्शन होईल व या दरम्यान शेतकऱ्यांनी मुगाची काढणी पुढील पाच दिवसात करून घ्यावी
29 तारखेपासून पुन्हा राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यात पावसाला सुरुवात होणार
मराठवाड्यातील नांदेड, परभणी, औरंगाबाद, जालना, लातूर, उस्मानाबाद, बीड तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर, सांगली, नगर, नाशिक तर विदर्भातील अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशिम आणि उत्तर महाराष्ट्रातील धुळे व जळगाव या जिल्ह्यात 29 ऑगस्टपासून ते दोन सप्टेंबर या दरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज
पावसामुळे भागातील धरण क्षेत्रात पाण्याची आवक वाढण्याची शक्‍यता

 

Advertisement
माहिती स्रोत हवामान अभ्यासक पंजाब डख पाटील
पत्ता मु.पो. गुगळी धामणगाव,  ता.सलू , जि.परभणी 431503  (मराठवाडा)
दिनांक 22 ऑगस्ट 2021
संकलन हवामान अंदाज महाराष्ट्र २०२१

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply