Take a fresh look at your lifestyle.

आणि तशा पद्धतीने क्लिप झाली व्हायरल; पहा लंकेंना लक्ष्य करून काय म्हटलेय आता तहसीलदारांनी

अहमदनगर : पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी पुन्हा एकदा थेट पत्रकारांसमोर आपली भावना व्यक्त केली आहे. त्यांनी त्यामध्ये बोलताना संबंधित सुसाईड नोट ऑडिओ क्लिप व्हायरल करण्याबद्दल स्पष्टीकरण दिलेले आहे. त्यामध्ये त्यांनी आपली भावना व्यक्त करून अनेक गंभीर आरोप केले आहेत.

Advertisement

देवरे यांनी म्हटले आहे की, मानसिकदृष्ट्या सावरले असून त्रास थांबलेला नाही. व्हायरल झालेली ऑडीओ क्लिप माझीच आहे. माझ्याच भावाने ती एका पत्रकार मित्राला दिली आणि मग ती व्हायरल झाली. ती अनेकांनी ऐकली आणि मला धीर दिल्याने मी सावरले आहे. वेळ आल्यावर आपलीही विचारशक्ती कशी संपते याचा अनुभव मी घेतला आहे. चौकशी अहवालाला घाबरून मी हे केलेले नाही. दबाव व भीती यामुळे नकारात्मक विचार करून ते लिहिले होते.

Advertisement

दरम्यान, ही क्लिप व्हायरल झाल्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे लोकप्रिय आमदार निलेश लंके यांनी तहसीलदार देवरे यांच्यावर प्रशासकीय कारवाई प्रस्तावित असल्याचा मुद्दा मांडून लक्ष वेधले होते. तसेच सध्या देवरे यांच्याबाबतचे एक पीडीएफ पत्र वेगाने व्हायरल होत आहे. त्यात त्यांच्या चौकशी अहवालाचे मुद्दे आहेत. तोच धागा पकडून देवरे यांनी पुन्हा एकदा आमदारांचे नाव न घेता म्हटले आहे की, मी कोणाचेही नाव घेतलेले नाही व घेणार नाही. तहसीलदार देवरे यांच्यासह अहमदनगर जिल्ह्यातील तहसीलदार व नायब तहसीलदार यांच्या संघटनेने आज जिल्हाधिकारी कार्यालयात याप्रकरणी निवेदन दिले आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply