Take a fresh look at your lifestyle.

HDFC वाले पुन्हा घेणार ‘त्यात’ भरारी; पहा दिलासा मिळाल्यावर काय केलेय नियोजन

मुंबई : रिझर्व्ह बँकेकडून (RBI) सूट मिळताच खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या HDFC बँक यांनी पुन्हा एकदा क्रेडिट कार्ड व्यवसायात आपले जुने स्थान मिळवण्यासाठीचे नियोजन केले आहे. पुढील एक वर्षात क्रेडिट कार्ड बाजारात आपला बाजार हिस्सा पुन्हा मिळवण्याचे बँकेचे उद्दिष्ट आहे. बँकिंग क्षेत्र नियामक रिझर्व्ह बँकेने अलीकडेच नवीन क्रेडिट कार्ड जारी करण्यासाठी एचडीएफसी बँकेवरील बंदी उठवली आहे.

Advertisement

तंत्रज्ञानाच्या आघाडीवर सतत अडचण आल्यानंतर केंद्रीय बँकेने एचडीएफसी बँकेला नवीन क्रेडिट कार्ड जारी करण्यास बंदी घातली होती. मात्र, आता त्यातून बँकेला दिलासा मिळाला आहे. एचडीएफसी बँकेचे पेमेंट्स अँड कन्झ्युमर फायनान्स ग्रुप हेड पराग राव यांनी पत्रकारांना सांगितले की, बँक या बाजारात पुन्हा प्रवेश करत आहे. बँकेने स्वत: साठी काही ध्येये निश्चित केली आहेत. पहिले लक्ष्य नवीन क्रेडिट कार्ड विक्री 3 लाखांवर नेण्याचे आहे. नोव्हेंबर 2020 मध्ये बंदीपूर्वी बँक या आकड्यावर होती.

Advertisement

ते म्हणाले की, याच्या सहामाहीत क्रेडिट कार्डची विक्री मासिक आधारावर 5 लाखांवर नेण्याचे त्यांचे ध्येय आहे. बंदीच्या काळात कार्डांच्या संख्येच्या बाबतीत बँकेने आपला बाजार हिस्सा गमावला आहे. परंतु खर्च करण्यास प्रोत्साहित केल्याने बँक आपला बाजार हिस्सा राखण्यात सक्षम राहिली आहे. एप्रिल-जून तिमाहीत क्रेडिट कार्डचा खर्च पोर्टफोलिओमध्ये 60 टक्क्यांनी वाढला आहे. आकडेवारीनुसार कार्डांच्या संख्येच्या बाबतीत एचडीएफसी बँकेचा बाजार हिस्सा दोन टक्क्यांनी घटून 25 टक्क्यांपेक्षा कमी झाला आहे. आयसीआयसीआय बँक आणि एसबीआय कार्ड्सने या संधीचा लाभ घेतला आणि बाजारातील वाटा कमी केला आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply