Take a fresh look at your lifestyle.

कधीतरी बॅंकेतील लाॅकर चेक करा, नाहीतर.. रिझर्व्ह बॅंकेने काय म्हटलेय पाहा..!

मुंबई : घरातील मौल्यवान दागिने, वस्तू, महत्त्वाची कागदपत्रे सुरक्षित राहावीत, यासाठी अनेक जण बँकेच्या लॉकर्सचा वापर करतात. घरात चोरीची भीती असल्याने अनेक धनिक वर्षानुवर्षे आपला मौल्यवान ठेवा बँकेच्या लॉकरमध्ये ठेवण्यास प्राधान्य देतात. सुरक्षिततेची हमी असल्यामुळे अनेकदा खूप दिवस या बँकेच्या लॉकरकडे फिरकूनही पाहिले जात नाही.

Advertisement

तुम्हीही बऱ्यात दिवसांत बॅंकेचे लाॅकर उघडून पाहिलेले नसेल, तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. रिझर्व्ह बँकेच्या बदललेल्या नियमानुसार आता तुम्हाला तीन महिन्यांतून एकदा बँक लॉकर उघडणे बंधनकारक आहे. काही दिवसांपूर्वीच यासंदर्भातील नियमावली प्रसिद्ध करण्यात आली. त्यानुसार एखाद्या ग्राहकाने दीर्घ काळ बँक लॉकर बंद ठेवले, तिकडे फिरकलाच नाही, तर बँकेला लॉकर तोडण्याची परवानगी देण्यात आली आहे.

Advertisement

बँकेकडून संबंधित ग्राहकाला लॉकर तोडण्यापूर्वी तसा ई-मेल वा फोन करुन अथवा नोटीस पाठवून सूचना दिली जाईल. मात्र, हे पत्र परत आले, तर बँक लॉकर तोडण्याची कारवाई करु शकते. दोन साक्षीदारांच्या उपस्थितीत लॉकर उघडावे, त्या संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडिओ चित्रण करण्याची रिझर्व्ह बँकेची अट आहे.

Advertisement

लॉकर फोडल्यानंतर त्यामधील सामुग्री सीलबंद लिफाफ्यात ठेवली जाईल. त्यानंतर ही सामुग्री मालकाने दावा करेपर्यंत बँकेच्या मालकीच्या अन्य चीजवस्तूंसह ठेवली जाणार आहे.

Advertisement

अशी आहे सुधारित नियमावली
*लॉकर्ससाठी बँका आता तीन वर्षांचे टर्म डिपॉझिट घेऊ शकतात. त्यातून तीन वर्षांचे भाडे आणि गरज पडल्यास लॉकर फोडण्याच्या पैशांचाही समावेश असेल. मात्र, सध्या बँकेत लॉकर्स असलेल्या ग्राहकांना ‘टर्म डिपॉझिट’ची सक्ती केली जाणार नाही.

Advertisement

* बँकेच्या लॉकरमध्ये कोणतीही बेकायदेशीर किंवा धोकादायक गोष्ट ठेवू नये. गेल्या काही काळात लॉकरमध्ये बेकायदेशीर वस्तू ठेवल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे रिझर्व्ह बँकेने हा नियम लागू केला आहे.

Advertisement

* ग्राहकाला लॉकर देताना बँकेने स्टॅम्प पेपरवर करारनामा करावा.

Advertisement

* ग्राहकाने सलग तीन वर्षे भाडे थकवल्यास बँकेला लॉकर फोडण्याची परवानगी असेल.

Advertisement

* नैसर्गिक संकटामुळे अथवा देवाच्या करणीमुळे लॉकरमधील वस्तू गहाळ झाल्यास बँक त्यासाठी जबाबदार असणार नाही.

Advertisement

पाऊस जाणार दीर्घ सुटीवर, परत कधी आगमन होणार, पाहा हवामान विभाग काय म्हणतोय..?
सीटीसीवर नाही, नेट पगारावर बॅंका कर्ज देतात.. तुम्हाला किती कर्ज मिळेल, असा करा हिशेब..!

Advertisement
Advertisement

Leave a Reply