Take a fresh look at your lifestyle.

‘सीटीसी’वर नाही, नेट पगारावर बॅंका कर्ज देतात.. तुम्हाला किती कर्ज मिळेल, असा करा हिशेब..!

नवी दिल्ली : कारसाठी, घरासाठी अनेक जण बॅंकांकडून कर्ज घेत असतात. मात्र, अनेकदा असे लक्षात येते, कागदावर तुमचा पगार चांगला दिसत असतानाही, बॅंका हवे तितके कर्ज देण्यास नकार देतात. कर्जासाठी अर्ज करणाऱ्यांचा गोंधळ उडतो. काही जण बॅंक अधिकाऱ्यांशी वाद घालतात, तर काही मिळेल त्यात समाधान मानतात. मात्र, पगाराच्या हिशेबात कसे कर्ज मिळते, त्यासाठी काय निकष आहेत, याबाबत आपण जाणून घेऊ या..

Advertisement

कर्जदाराचे वय, मासिक उत्पन्न, मागील कर्ज, क्रेडिट स्कोअर, नोकरीची स्थिती आणि क्रेडिट हिस्ट्री, अशा सगळ्यांचा विचार करुन बॅंका कर्ज देत असतात. त्यातही सर्वात महत्त्वाचे म्हणजे, कंपनी वा संस्थेकडून मिळणाऱ्या पगार हा कर्जासाठी सगळ्यात महत्वाचा घटक आहे.

Advertisement

कंपनीकडून दिल्या जाणाऱ्या पेमेंट स्लिपवर अनेक घटक असतात. हे सर्व घटक एकत्र करुन तुम्हाला वेतन दिले जाते आणि त्यानुसारच बँकाही कर्ज देतील, असे वाटत असेल, तर थांबा.. खरं तर तुमचा पगार 6 खर्च मिळून तयार होतो. हे 6 खर्च म्हणजे, मूलभूत पगार (बेसिक), वैद्यकीय भत्ता, रजा प्रवास भत्ता (LTA), घरभाडे भत्ता (HRA), वाहनभत्ता आणि इतर भत्ता.

Advertisement

प्रत्येक महिन्याला मिळणाऱ्या पेमेंट स्लिपवर तुम्ही हे सगळे घटक पाहिले असतील. सर्व 6 खर्च एकत्र करून एक तांत्रिक संज्ञा तयार केली जाते, त्यास सीटीसी (CTC), अर्थात ‘कॉस्ट टू कंपनी’ असे म्हणतात. हा कंपनीचा खर्च आहे, जो आपल्यासाठी सहन केला जातो. याचा अर्थ असा नाही की जितके जास्त ‘सीटीसी’ असेल, तितके पैसे तुमच्या खात्यात दरमहा येतील.

Advertisement

तुमच्या बॅंकखात्यात दरमहा येणाऱ्या पैशांना ‘नेट पगार’ म्हणतात. नेट पगार, म्हणजे पीएफ, टीडीएस आणि कंपनीच्या काही कपातीनंतर दिली जाणारी रक्कम…

Advertisement

आता तुम्ही गृहकर्ज घेण्यासाठी बँकेत जाता, तेव्हा तुम्हाला ‘नेट पगार’ विचारला जातो. काही वर्षांसाठी ‘आयटीआर’साठी विचारले जाते. त्यामुळे तुम्हाला दर महिन्याला हातात किती पैसे मिळतात, हे कळते.

Advertisement

बँकांच्या नियमानुसार, नेट पगाराच्या 60 पटीपर्यंत गृहकर्ज मिळू शकते. उदा. तुमचा नेट पगार 55,000 असेल, तर तुम्ही बँकेकडून 33 लाखांपर्यंत गृहकर्ज घेऊ शकता. पगार 35 हजार असेल, तर 25.5 लाख, 60 हजार पगाराला 46.5 लाखांचे गृहकर्ज मिळू शकते.

Advertisement

नेट पगार 50-55 हजारांपर्यंत असल्यास तुम्हाला 30-35 लाखांदरम्यान 7 टक्के व्याजासह कर्ज मिळू शकते. कर्जाची रक्कम आणि व्याजदर घरात किती लोक कमावतात, यावर अवलंबून असते. शिवाय कर्जदाराचे वय, त्याच्या रोजगाराची स्थिती, त्याचा क्रेडिट स्कोअर आणि सिक्युरिटीवरील कर्जाचे मूल्य यावर बरेच काही अवलंबून असते.

Advertisement

पाऊस जाणार दीर्घ सुटीवर, परत कधी आगमन होणार, पाहा हवामान विभाग काय म्हणतोय..?
‘त्या’ निर्णयाने ३३ हजार ८९५ शेतकऱ्यांना दिलासा; पहा नेमका काय निर्णय घेतलाय सरकारने

Advertisement
Advertisement

Leave a Reply